भाजप आ. जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढल्या अटकपूर्व जामीन फेटाळला

वडूज : सातारा  जिल्ह्यातील एका फसणुकीच्या गुन्ह्यात आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. कारण सर्वाच्च न्यायालयाने  गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच कोर्टासमोर येऊन रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचे आदेशही कोर्टाने गोरे यांना दिले आहेत

यापूर्वी गोरे यांना वडूज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मात्र त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात दाद मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, येथेदेखील त्यांना दिलासा मिळालेला नसून, सुप्रीम कोर्टाने गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत जामीनासाठी कोर्टासमोर येऊन रितसर अर्ज करण्याचे आदेश दिले आहेत.

मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे , महेश पोपट बोराटे यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी गोरेंनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. तेथेदेखील त्यांना दिलासा न मिळाल्याने अखेर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. त्यात कोर्टाने गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत वरील आदेश दिले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला