अंगापुरच्या मनमानी उपसरपंचावर अविश्वासचा ठराव
Satara News Team
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री मच्छिंद्र नारायण नलावडे यांच्यावर तहसीलदार तसा दंडाधिकारी सातारा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला होता.
तहसीलदार श्री नागेश गायकवाड यांनी आज सकाळी 11 वाजता अविश्वास ठरावाची बैठक ग्रामपंचायत अंगापूर येथे आयोजित करण्यात केली होती.
या बैठकीमध्ये श्री मच्छिंद्र नारायण नलावडे यांच्या विरोधात 10 विरुद्ध 0 या फरकाने अविश्वास ठराव संमत करण्यात आला. विद्यमान उपसरपंच हे पूर्वी शिक्षण विभागामध्ये काम करत होते आणि ते निवृत्त केंद्रप्रमुख आहेत.
गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता कारभार सुरू केला होता. सरपंच पद हे महिला राखीव असल्यामुळे महिला सरपंचांना विश्वासात न घेता ते कारभार करत होते. सर्व सदस्यांशी खास करून महिला सदस्यांशी उद्धट आणि उर्मट वर्तन वागणूक, ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या ग्रामस्थांशी असहकाराची भावना आणि नकारार्थी कार्यप्रणाली या गोष्टीला संपूर्ण गाव गेल्या काही दिवसापासून त्रस्त होते.
ग्रामस्थ आणि सदस्य यांच्या तक्रारीचा विचार करून ग्रामपंचायतीत सत्तारूढ असलेल्या श्री एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनलच्या कोर कमिटीने काही दिवसापूर्वी निर्णय घेऊन त्यांच्यावर अविश्वास दाखल करण्यात आला होता.
अंगापूरच्या इतिहासामध्ये बहुदा असे कधी घडले नाही परंतु विद्यमान उपसरपंच यांच्या वर्तनास कंटाळून ग्रामपंचायत सदस्य आणि श्री ग्राम विकास पॅनल यांच्या वतीने त्यांच्यावर विश्वास ठराव दाखल करण्यात आला.
यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पॅनलचे प्रमुख श्री हणमंतराव गणपती कणसे गुरुजी यांनी श्री मच्छिंद्र नारायण नलावडे यांना पॅनल मधून हकलण्याचा निर्णय जाहीर केला इथून पुढच्या काळात श्री नलवडे यांचा श्री एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनलशी कसलाही संबंध असणारा नाही अशा पद्धतीची माहितीही श्री हणमंतराव कणसे यांनी जाहीर केले. या अविश्वास ठरावासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैशाली जाधव माजी उपसरपंच, श्री हणमंत कणसे, विश्वनाथ कणसे, पोपट सुतार, नवनाथ गायकवाड, माजी सरपंच सौ.वर्षा कणसे, सौ.निलम कणसे,सौ.प्रियांका निकम, सौ.सुमन भुजबळ,सौ.हेमलता भूजबळ या सर्व सर्व सदस्यांनी या बैठीकत सहभाग घेवून अविश्वासाच्या बाजुने मते दिली. ग्रामविकास पॅनलच्या कोअर कमिटीचे सर्व सदस्य श्री.हणमंतराव कणसे,श्री जयसिंगराव कणसे,श्री पोपटराव कणसे, श्री संतोषराव कणसे(भाऊ), श्री धोंडीराम कणसे, महादेव कणसे,श्री राजेंद्र कणसे,श्री पांडुरंग हरीबा कणसे श्री सुभाष जाधव गुरुजी श्री.वसंतराव कणसे, श्री दिनकर राव कणसे(माजी चेअरमन) श्री गणपतराव कणसे श्री दादासाहेब कणसे (सचिव) श्री बबन ढाणे आदी, मान्यवरांनी या कामी सहकार्य केले.
अविश्वास ठराव संपूर्ण बैठक साताऱ्याचे तहसीलदार श्री नागेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. सगरे साहेब (ग्रामसेवक), श्री.अडक, गावकामगार तलाठी, आदी अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Thu 2nd Jan 2025 03:31 pm