समोरासमोर येऊन चर्चा करा, आता हा डायलॉग उदयनराजे यांनी बदलावा...आमदार शिवेंद्रसिंहराजे

सातारा : भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोरासमोर येऊन उत्तर द्यावे, हे डायलॉग आता खासदार उदयनराजे भोसले यांनी बदलावेत. नवीन काहीतरी बोलावे आणि सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावे, असा जोरदार प्रतिटोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.

सातारा नगरपालिकेने आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. उदयनराजे यांनी बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही, या शब्दात शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीका केली होती, आणि काय बोलायचे असेल तर समोर या, असेही आव्हान दिले होते. या आव्हानाला प्रति टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रियाद्वारे दिला आहे.

ते म्हणाले, उदयनराजे भोसले आणि आमचे निवासस्थान समोरासमोर आहे. त्यांना जर समोरासमोर येऊन बोलायचे असेल तर त्यांनी खुशाल यावे आणि बोलावे. समोरासमोर येण्याचे सारखे-सारखे तेच डायलॉग त्यांनी मारू नयेत. सातारकरांसाठी काहीतरी करावे. जर ते इडी चौकशी लावायला तयार आहेत तर त्यांनी त्याबाबतचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्यावे. कारण ते राज्यसभेचे खासदार आहेत. ते वारंवार दिल्लीला जातात. त्यामुळे अशा चौकशीची मागणी ते सहज करू शकतात. ज्या अर्थी ते ईडी चौकशीच्या संदर्भाने बोलतात आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, याचा अर्थ पालिकेत भ्रष्टाचार झाला आहे हे त्यांना मान्य आहे. सातत्याने दुसऱ्याविषयी टिकेची झोड उठवायची, हे बरे नाही. उदयनराजे यांनी आता सातारकारांसाठी काहीतरी करून वेगळे काहीतरी डायलॉग बोलावेत, असा टोला त्यांनी लगावला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला