'हा आमच्या घरातला प्रश्न... 'सामना' अग्रलेखावरुन शरद पवारांनी राऊतांना सुनावले खडेबोल

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट झाला असला तरी राजकीय वर्तुळात त्याची अजूनही चर्चा सुरू आहे. शरद पवारांचा आधी राजीनामा आणि नंतर तो मागे घेण्याचा निर्णय यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावरुनच सामना अग्रलेखातून शरद पवार वारसदार तयार करण्यात अपयशी ठरले अशी टीका केली होती.

सामना मधील संजय राऊतांच्या या टीकेला शरद पवार यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी यावरुन संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सातारा  दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी सामना मधील त्या टीकेचा समाचार घेतला .काय म्हणाले शरद पवार..

"आम्ही काय केलंय हे त्यांना माहिती नाही. आमचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पक्षाचे सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतं असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करत नसतो. हा आमच्या घरातला प्रश्न असतो. आमच्या प्रत्येक सहकाऱ्याला हे माहिती असतं की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्वाची फळी पक्षात कशी तयार केली जाते याची खात्री पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना आहे," असं शरद पवार म्हणाले. तसेच "पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे," असेही शरद पवार यावेळी म्हणाले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला