सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!
Satara News Team
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आणि पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायती आणि 172 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी आज जाहीर केला. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी सातारा न्यूज ला दिली आहे.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम आज उपजिल्हाधिकाऱ्यानी जाहीर केल्यामुळे आता गावागावात निवडणुकीची रंगात रंगणार आहे.
133 ग्रामपंचायतींची सार्वजनिक निवडणुक
साधारणतः सातारा तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 16, पाटण तालुक्यातील 26, कोरेगाव तालुक्यातील 13, वाई तालुक्यातील 16, महाबळेश्वर तालुक्यातील 17, जावली तालुक्यातील 24, फलटण तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 4 व खटाव तालुक्यातील 8 अशा एकूण 133 ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
172 ग्रामपंचायतींच्या 249 जागांसाठी पोट निवडणुक
सातारा तालुक्यातील 27, कराड तालुक्यातील 9, पाटण तालुक्यातील 25, कोरेगाव तालुक्यातील 10, वाई तालुक्यातील 9, खंडाळा तालुक्यातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 30, जावली तालुक्यातील 33, फलटण तालुक्यातील 9, माण तालुक्यातील 3 व खटाव तालुक्यातील 12 अशा एकूण 172 ग्रामपंचायतींच्या 249 जागांसाठी पोट निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
‘या’ दिवशी होणार अर्ज छाननी आणि मतमोजणी
उपजिल्हाधिकारी आवटे यांनी जाहीर केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, दि.16 ते 20 ऑक्टोंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहेत. तसेच दि. 23 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजल्या पासून नामनिर्देशनपत्र छाननी केली जाणार आहे. त्यानंतर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख हि दि. 25 ऑक्टोंबर असून दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दि. 25 ऑक्टोंबर दुपारी 3 वाजल्यानंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी दि. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषीत केला जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दि. 9 नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Tue 10th Oct 2023 08:48 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Tue 10th Oct 2023 08:48 pm