कराड उत्तरचा आमदार एकदा बदला चित्रलेखा माने कदम ताई

रहिमतपूर येथे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; शहरातून भव्य रॅली

देशमुखनगर : गेल्या २५ वर्षापासून कराड उत्तरचा विकास रखडला आहे. त्यासाठी बिनकामाचा निष्क्रीय आमदार एकदा बदला. महायुतीच्या माधमातून कराड उत्तर मतदारसंघाचा कायापालट करु, कराड उत्तर विभागातील कोरेगाव तालुक्यातील जी गावे पाण्यापासून वंचित आहेत त्या गावांना जिहे कटापूर योजनेतून लवकरच पाणी देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पंरतू महायुतीने केलेल्या कामांचे श्रेय घेवून विद्यमान आमदार घेवून दिशाभूल करतात. त्यांचा जाब तुम्हीच विचारा तसेच फक्त एकवेळ बदल घडवून दाखवू या असे आवाहन चित्रलेखा माने कदम ताई यांनी केले कराड उत्तर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांचा जोरदार प्रचार सुरू असून मोठ्या प्रमाणावर जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी रहिमतपूर येथे प्रमुख मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी भाजपचे सातारा जिल्ह्याध्यक्ष धैर्यशीलदादा कदम मा.संपत दादा माने, मा. चित्रलेखा माने कदम ताई, मा. वासुदेव माने काका, मा. सचिन बेलागडे, मा. रणजित माने, निलेश माने व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चित्रलेखा कदम ताई म्हणाल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. हा मतदारसंघ विद्यमान आमदारांच्या एकेरी कारभाराला कंटाळला आहे. त्यामुळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे सत्तेचे विकेंद्रकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्य हेतू या निवडणुकी मागचा आहे. गेल्या पंचवीस वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जनतेच्या भल्यासाठी कोणताही मोठा प्रकल्प किंवा शाश्वत विकास कामे न करणाऱ्या निष्क्रिय आमदारांना घरी बसवण्यासाठी रहिमतपूर करांनी मोठ्या ताकदीने एकत्र यावे. 

 शेतकऱ्यांना शेतीसाठी १२ महिने पाणी मिळण्यासाठी, महिलांना लघुउद्योगृह, उद्योग निर्माण करुन सक्षमीकरणासाठी, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात व जनतेचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी महायुतीच्या माध्यमातून काम सुरू आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून महिला, शेतकरी, युवक,सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. यावेळी नानासो माने, जनार्दन चव्हाण गुरुजी, शंकर भोसले, धनंजय पवार, मुघगटराव माने, विकास माळी, राजेंद्र रोकडे, प्रवीण माने, अंकुश भोसले, तुषार चव्हाण,सेखरअण्णा माने, सतीश लावघरे,एडवोकेट अधिराज माने, केटी माने सर, सिद्धू माने विशाल माने, पोपट वायदंडे, राजू सय्यद सर, सैफ डांगे, अनिकेत माने, पवार पवार मॅडम, कोपर्डीकर मॅडम, तारखे मॅडम, जयवंत माने सर, अच्युत माने सर अशोक माने सर राजू माने फौजी,लिंबाजी सावंत आदी ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्तित होते

रहिमतपूर विभागातून मनोजदादांना मताधिक्य देणार... 

 रहिमतपूर शहराने मनोजदादा घोरपडे यांची कायमच पाठराखण केली आहे. शुक्रवारीही शेकडोंच्या संख्येने नागरीक प्रचार शुभारंभ व रॅलीत सहभागी झाले होते. मनोजदादा हे शांत संयमी व विकसनशील नेतृत्व असून मतदारसंघाच्या विकासासाठी अशा नेतृत्वाची गरज आहे. रहिमतपूर विभागातून प्रचंड मताधिक्य मनोजदादांना देणार असल्याच्या भावना प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केल्या
 निलेश माने विरोधी पक्ष नेते
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला