साताऱ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला राज्यपाल आणि त्रिवेदी यांचा तीव्र निषेध

सातारा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे नेते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद साताऱ्यातही उमटले. सातारा जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज आक्रमक पावित्रा घेत तीव्र निषेध व्यक्त केला.

सातारा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून ते पोवई नाक्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. यावेळी ‘मोदी हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिह कोश्यारी, शुधांशू त्रिवेदी यांचा निषेध नोंदवला.

यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपचे बेगडी हिंदुत्व असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर खोटी सत्ता मिळवली असल्याची टीका पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, आज सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्यपाल व त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला