तेजस ठाकरे यांनी साधला जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी सवांद
उपनेते प्रा.नितीन बानूगडे-पाटील यांनी केले त्यांचे स्वागतप्रकाश शिंदे
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
- बातमी शेयर करा

सातारा : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळख आहे. त्यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे जाताना सातारा येथे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांचे सातारा जिल्हा शिवसेनेच्यावतीने उपनेते प्रा. नितीन बानूगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी स्वागत केले. त्यांच्या सातारा भेटीमध्ये जिल्ह्यातील शिवसैनिक चांगले रिचार्ज झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेकडे सध्या प्राधान्याने राज्याचे लक्ष आहे. शिवसेनेतून बंड केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारचे तर त्यांना साथ देणारे आमदार शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे हे ही सातारचे. त्यामुळे शिवसेनेचा मूळ सातारा जिल्ह्यातील गट अधिक सक्षम कसा करता येईल याSatara News Teamसाठी शिवसेनेकडून विशेष लक्ष सातारा जिल्ह्यात घातले आहे. त्यासाठी दिवाकर रावते यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात दौरा करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले. त्यानंतर फक्त फलटणचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव हे शिंदे गटात दाखल झाले. बाकी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी निष्ठेने आणि आणखी दुप्पट वेगाने कामाला लागले. त्यात जिल्हा प्रमुख म्हणून पुन्हा हर्षद कदम या लढवय्या सच्चा शिवसेन्याच्या ढाण्या वाघावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे शिवसेनेत असलेले सर्वच पदाधिकारी सभासद नोंदणी जास्तीत जास्त कशी करता येईल यासाठी कामाला लागले. असे असताना शुक्रवारी दुपारी कोल्हापूर दौऱ्यावर निघालेले तेजस ठाकरे यांनी साताऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी यांची भेट घेतली त्यांचे स्वागत शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षल कदम,उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अभिजित गार्डे यांनी सातारच्या पध्दतीने केले. साताऱ्यात प्रथमच तेजस ठाकरे हे आल्याने त्यांच्या सातारच्या भेटीने जिल्ह्यातील शिवसैनिक आणखी जोराने कामाला लागल्याचे शिवसेनेतून सांगण्यात आले.
udhavthakre
tejasthakre
sevsena
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 29th Jul 2022 02:37 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Fri 29th Jul 2022 02:37 pm