आ. मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्या कर्तृत्वाला जनता कंटाळली... जिल्हअध्यक्ष विराज शिंदे

वाई : सातारा जिल्ह्यचे माजी खा. स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संस्कृती व शिस्तीचे धडे देत प्रगल्भ अशा राजकारणाची परंपरा निर्माण केली.परंतु त्यांचेच पुत्र हि परंपरा खंडित करून सत्तेचा गैरवापर करित वाई विधानसभा मतदार संघात बेबंदशाही निर्माण करित आहेत.सर्व सामान्य जनतेच्या कष्टाचा दाम स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरला जात असुन हि कृती त्यांच्या कर्तृत्वाला शरम आणणारी आहे.आ. मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्या कर्तृत्वाला जनताच आता कंटाळली असुन त्यांना धडा शिकविण्यासाठी सज्ज होउ लागली आहे हे बदलत्या राजकारणाचे धोतक असल्याचे सांगत सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हअध्यक्ष विराज शिंदे यांनी खासदार पुत्रांच्या कृती आणि विचारावर सडकुन टिका केली.
                       याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की ,सातारा जिल्ह्याच्या समाजकारण आणि राजकारणाला स्व. यशवंतराव चव्हाण ,स्व. किसन वीर यांनी प्रगल्भ अशी परंपरा निर्माण केली आहे.तीच परंपरा स्व. अभयसिंहराजे
भोसले ,स्व.लक्ष्मणराव पाटील ,स्व. विलासराव पाटिल - उंडाळकर यांच्या सारख्या नेत्यांनी जपली आणि वाढवली.स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या पुण्याईने आ. मकरंद पाटील आणि नितिन पाटील लोकशाहितील व सहकारातील सर्व पद भोगत आहेत. परंतु बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या राजकारणाची हि दिशा बदलली आहे.ज्या जनतेच्या जीवावर आपण खुर्चीवर आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही. काहि महिंन्या पुर्वीच किसनवीर कारखान्यात सभासदांनी मोठ्या अपेक्षेने सत्तांतर घडवुन आणले त्याच सभासदांच्या भावनेशी खेळण्याचे काम हे पाटील बंधु करित आहेत. सत्तांतराच्या अगोदर थकित असलेल्या सभासदांच्या करोडो रुपयांच्या बीलाला कोणी वालीच राहिलेला नाही. फक्त टोलवा-टोलवी करून एकमेकाकडे बोट दाखवली जात आहेत. यांच्या या खेळात सर्वसामान्य शेतकरी मात्र चांगलाच भरडला जात आहे. याच बरोबर ज्या अपेक्षेने सभासदांनी किसनवीर कारखाना यांच्या ताब्यात दिला त्या सभासदांच्या अपेक्षा पायदळी तुडवत सत्तेचा गैरवापर सुरु करण्यात आला आहे. आजारी असलेला कारखाना सभासदांनी योगदान दिल्यानेच पुन्हा एकदा सुरु झाला आहे. परंतु हा कारखाना सुरळीत सुरू होण्याच्या अगोदरच शेतकरी सभासदांच्या पैशावर स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.हि त्यांची कृती लाजिरवाणी अशीच आहे. किसनवीर अजुनहि पुर्ण क्षमतेने सुरू नसल्याने व उस तोडणी यंत्रणा मजबुत नसल्याने हजारो एकरावरील उस तसाच उभा आहे. उन्हाळ्याची दाहकता सुरु झाली असुन जर का शेतकऱ्यांचा उस शिवारात उभा राहिल्यास पाटिल बंधुच्या कर्तृत्वाच अपयश असणार आहे. याच बरोबर जिल्हा बँकेच्या माध्यमातुन विद्यमान चेअरमन असलेले नितिन पाटील सोसायट्यांना सामाजिक कार्यक्रमाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी देण्यास भाग पाडत आहे. त्यांचे हे वागणे सहकाराला घातक असुन अशा गोष्टीमुळेच सहकार रसातळाला जाउ शकतो याचेहि भान त्यांनी ठेवले पाहिजे.
           खंडाळा कारखाना कसा आणि किती दिवस चालला ? झालेले कमी गाळप यामुळे तोटा झाला कि नफा ? या गोष्टीहि शेतकरी सभासदांच्या समोर आल्या पाहिजेत.आ. मकरंद पाटील आणि नितिन पाटील हे सत्तेच्या माध्यमातुन राबवत असलेली हुकुमशाहि लोकशाहीसाठी धोक्याची आहे.स्व. लक्ष्मणराव पाटील यांनी निर्माण केलेली संस्कृती आणि शिस्तीची उज्वल परंपरा मोडित काढणाऱ्या पाटील बंधुना जनता कधीच माफ करणार नाही. त्यांच्या कृतीचा सर्व हिशोब जनताच करणार असुन आगामी काळात हे स्पष्ट होईल.
.

                

        
किसनवीर कारखान्यात राबुन शेतकऱ्यांच्या उसातुन पांढर सोन निर्माण करणाऱ्या कामगारांचा पगार ३१ महिने थकित आहे. ज्या कामगारांच्या जीवावर कारखान्यातील सत्तेच्या जीवावर आपल राजकिय अस्तित्व निर्माण करण्यात विद्यमान चेअरमन दंग आहेत त्या कामगारांच्या चुली विझु लागल्या आहेत याचे हि भान त्यांनी ठेवावे. कारखान्याचा पैसा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी न वापरता विझु लागलेल्या चुली पेटवण्यासाठी वापराव्यात. अन्यथा याच कामगारांचे मिळणारे शाप सत्ताधाऱ्यांचे राजकिय आयुष्य उदध्वस्त करतील.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला