घरासमोर चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला, आईसमोरच चिमुकलीला जबड्यात पकडून कुत्र्याने नेले पन्नास फूट शेतात
Satara News Team
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
- बातमी शेयर करा

कराड : घरासमोर आईच्या हाताला धरून चालत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला चढवला. चिमुकलीला जबड्यात पकडून कुत्र्याने तिला सुमारे पन्नास फूट शेतात फरपटत नेले. मात्र, आईने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेत चिमुकलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. अविरा स्वप्नील सरगडे (वय ३) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीवर कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोपर्डे हवेली गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असतानाच मंगळवारी सायंकाळी तीन वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केला. गावातील अविरा सरगडे ही तीन वर्षांची चिमुकली मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी आपली आई पूजा यांच्याबरोबर घराबाहेर आली. यावेळी चिमुकली आपल्या आईच्या हाताला धरून घरासमोर चालत असताना अचानकपणे मोकाट कुत्र्याने पाठीमागून येऊन तिच्यावर हल्ला केला.
कुत्र्याने अविराच्या हाताला, दंडाला चावा घेऊन तिला सुमारे पन्नास फूट फरपटत शेतात नेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अविराची आई पूजा यांनी आरडाओरडा करून कुत्र्याला पळवून लावले. पूजा यांनी ग्रामस्थ व नातेवाइकांच्या मदतीने अविराला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Wed 4th Sep 2024 08:38 pm
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Wed 4th Sep 2024 08:38 pm