पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील विमान अपघातस्थळी पोहोचले, जखमींनाही भेटणार
Satara News Team
- Fri 13th Jun 2025 09:32 am
- बातमी शेयर करा

दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातानंतर देशभरात शोकाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी अपघातस्थळाला भेट दिली असून जखमींनाही भेटणार आहेत.
पंतप्रधानांकडून घटनास्थळाची पाहणी आज सकाळी सुमारे ८ वाजून ३० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबाद विमानतळावर आगमन केले. त्यानंतर, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी झालेल्या व्यक्तीची भेट घेणार असल्याचे समजते.
मदत कार्य थांबले
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर मदतकार्य आता थांबले आहे. अपघाताबाबत एअर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. एअरलाइनने म्हटले आहे की, अपघाताच्या वेळी विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. फक्त एक प्रवासी वाचला आहे, ज्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विमान अपघाताच्या चौकशीत अमेरिका मदत करणार एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघाताच्या चौकशीत आता यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) देखील सामील होईल. NTSB ने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये माहिती दिली आहे की ते तज्ञांची एक टीम भारतात पाठवत आहे, जी भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) सोबत या अपघाताच्या चौकशीत सहकार्य करेल.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत
टाटा ग्रुपने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, टाटा ग्रुप अपघातात जखमी झालेल्यांना पूर्ण उपचार देईल आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवेल. तसेच, बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामातही मदत करेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज १५/६/२०२५ रविवार
- Fri 13th Jun 2025 09:32 am
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Fri 13th Jun 2025 09:32 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज १४/६/२०२५ शनिवार
- Fri 13th Jun 2025 09:32 am
पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील विमान अपघातस्थळी पोहोचले, जखमींनाही भेटणार
- Fri 13th Jun 2025 09:32 am
राशिभविष्य आज १३/६/२०१५ शुक्रवार
- Fri 13th Jun 2025 09:32 am
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Fri 13th Jun 2025 09:32 am
संबंधित बातम्या
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज १५/६/२०२५ रविवार
- Fri 13th Jun 2025 09:32 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज १४/६/२०२५ शनिवार
- Fri 13th Jun 2025 09:32 am
-
राशिभविष्य आज १३/६/२०१५ शुक्रवार
- Fri 13th Jun 2025 09:32 am
-
RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी'
- Fri 13th Jun 2025 09:32 am
-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 13th Jun 2025 09:32 am
-
औंधच्या मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत कोसळली.
- Fri 13th Jun 2025 09:32 am
-
अजिंक्यतार्यावर मध्यरात्री स्ट्राईक... पायथ्यालगतचे अनाधिकृत थडगे हटवले
- Fri 13th Jun 2025 09:32 am
-
व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी
- Fri 13th Jun 2025 09:32 am