मार्डी घाडगे मळा शिवारात विहिरीचे काम करीत असताना एकाचा विहरीत पडुन मृत्यू.
विशाल गुरव पाटील
- Tue 13th May 2025 01:08 pm
- बातमी शेयर करा

आंधळी, : मार्डी ता. माण येथे आज दि. १३ रोजी सकाळी ७ सुमारास नवीन विहीरीचे काम चालू असताना रावसाहेब बापूराव देसाई वय ६४ रा.मार्डी यांचा विहीरीच्या कट्यावरती पडून गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मार्डी येथील संजय देशमुख यांच्या शेतात नवीन विहीरीचे खोदकाम चालु होते . खोदकाम पुर्ण झालेवर दगडी कटड्याचे काम गेली 8 दिवस सुरू आहे. संजय देशमुख यांचे भावकितील लोकच बांधकाम करत होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 7 ते 7 :30 च्या सुमारास बांधकामास लोक विहिरीवर पोहचले होते . काहीजण कपडे बदलत होते त्यावेळी रावसाहेब देसाई अंदाजे वय ६४ हे घमेले व खोरे घेण्यासाठी कठड्यावरून चालत चालले असताना अचानक तोल जाऊन विहिरीतील सपावर पडले व त्यांनंतर पाण्यात पडले. अचानकपणे घडलेल्या प्रकाराने सगळेजण घाबरले त्यातील दोघांनी लगेच पाण्यात उड्या मारून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पाणी जास्त असल्याने ते सापडले नाहीत . तोपर्यंत विहीर मालक संजय देशमुख तेथे पोहचले त्यांनी लगेच घडलेल्या घटनेची माहिती पोलिस पाटील यांना कळवली .
पोलीस पाटील यांनी लगेच पोलीस ठाण्यात माहिती कळवून घटनास्थळी गेले . गावातील काही युवकांच्या मदतीने बॉडी पाण्यातुन बाहेर काढली .
सदर घटनेची नोंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Tue 13th May 2025 01:08 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Tue 13th May 2025 01:08 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Tue 13th May 2025 01:08 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Tue 13th May 2025 01:08 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Tue 13th May 2025 01:08 pm
संबंधित बातम्या
-
प्रीतिसंगमावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा
- Tue 13th May 2025 01:08 pm
-
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Tue 13th May 2025 01:08 pm
-
कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील युवती ठार
- Tue 13th May 2025 01:08 pm
-
सातारा-लोणंद मार्गावर सालपे नजीक मिनी ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात; ३ जण ठार तर ८ जण जखमी
- Tue 13th May 2025 01:08 pm
-
अंगणवाडीतील चिमुकलीचा बुडून मृत्यू; शाळकरी बंधू बेपत्ता
- Tue 13th May 2025 01:08 pm
-
वाई बस स्थानकासमोर अपघात ,एकाचा मृत्यू चार जखमी.
- Tue 13th May 2025 01:08 pm
-
महामार्गावरील खांबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकर व तीन कारचा विचित्र अपघात
- Tue 13th May 2025 01:08 pm
-
शिरवळ जवळ भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी
- Tue 13th May 2025 01:08 pm