वाई बस स्थानकासमोर अपघात ,एकाचा मृत्यू चार जखमी.
Satara News Team
- Sat 25th Jan 2025 10:08 am
- बातमी शेयर करा

वाई : वाई महाबळेश्वर रस्त्यावर वाई बस स्थानकाच्या समोर भरधाव मोटारीने पदचार्यांना ठोकर मारल्याने एका पदाचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. साडेतीन वर्षाच्या मुलासह अन्य चार जण गंभीर जखमी झाले. वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.भर गर्दीच्या रस्त्यात भरधाव वाहन घुसल्याने हा अपघात झाला असे परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली.
वाई बस स्थानकाच्या समोर महाबळेश्वर येथून वाई शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वाहनाने गाडी क्रमांक (एमएच ०४ जीई ६६९५) रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पदचार्यांना जोरदार धडक मारली. गाडी त्याच वेगात पुढे जात राहिल्याने गाडीच्या धक्क्याने एका पदाचाराचा जागीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते ( सोळशी, ता कोरेगाव) यांचा जागी मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे (वारोशी, ता महाबळेश्वर) सिताराम धायगुडे (वाई) व शिवांश जालिंदर शिंगटे(राऊतवाडी ता कोरेगाव)हा साडेतीन वर्षांचा) हे गंभीर जखमी झाले. जखमीना वाई व सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
सर्व पदचारी वाई बाजारपेठेतील आपली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचार च्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील अन्य तीन जण पळून गेले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता हातकणंगले,कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 25th Jan 2025 10:08 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 25th Jan 2025 10:08 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 25th Jan 2025 10:08 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 25th Jan 2025 10:08 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 25th Jan 2025 10:08 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 25th Jan 2025 10:08 am
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 25th Jan 2025 10:08 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 25th Jan 2025 10:08 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 25th Jan 2025 10:08 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 25th Jan 2025 10:08 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 25th Jan 2025 10:08 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sat 25th Jan 2025 10:08 am
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sat 25th Jan 2025 10:08 am
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sat 25th Jan 2025 10:08 am