महामार्गावरील खांबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकर व तीन कारचा विचित्र अपघात

सातारा : पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खांबाटकी बोगद्याच्या पुढे कंटेनर, टँकर व तीन कार यांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये तीन कार व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर धडीसह निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती.

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जुन्या टोलनाक्याजवळ एका कंटेनरची पुढील दोन्ही चाके निखळल्याने रस्त्यावरच आडवा झाला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या बोगद्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. हा कंटेनर रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी सायंकाळी साडेचारच्या सुमारास खांबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर उतारावर कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एका कारला धडक दिली. ही कार पुढील टँकरवर आदळली त्याचवेळी कंटेनर ने दुसर्‍या दोन कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एक कार दुसर्‍या कारवर आदळून ती त्या कारच्या वर जाऊन आदळली. या अपघातामुळे खांबाटकी बोगदा ते जुन्या टोलनाक्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

 घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला