सातारा-लोणंद मार्गावर सालपे नजीक मिनी ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात; ३ जण ठार तर ८ जण जखमी
राजेंद्र बोंद्रे
- Sun 11th May 2025 01:00 pm
- बातमी शेयर करा

लोणंद - सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले
हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधुन उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने त्यांच्यावर घाला घातला.
या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.* *याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच ०४ सीपी २४५२ ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपेचा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताराकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 42 बीएफ 7784 हा ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला.
या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या विषयात टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.* *अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. याबाबतची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते. पुढील तपास सपोनि सुशील भोसले करीत आहेत.
यामध्ये मृत ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय 24) रा.मालगाव पाटील गल्ली गणेश नगर शिरढोण तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. रजनी संजय दुर्गुळे (वय 48) रा.पेठ वडगाव तालुका हातकलंगले अशी नावे आहेत.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Sun 11th May 2025 01:00 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Sun 11th May 2025 01:00 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Sun 11th May 2025 01:00 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Sun 11th May 2025 01:00 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Sun 11th May 2025 01:00 pm
संबंधित बातम्या
-
प्रीतिसंगमावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा
- Sun 11th May 2025 01:00 pm
-
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Sun 11th May 2025 01:00 pm
-
कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील युवती ठार
- Sun 11th May 2025 01:00 pm
-
मार्डी घाडगे मळा शिवारात विहिरीचे काम करीत असताना एकाचा विहरीत पडुन मृत्यू.
- Sun 11th May 2025 01:00 pm
-
अंगणवाडीतील चिमुकलीचा बुडून मृत्यू; शाळकरी बंधू बेपत्ता
- Sun 11th May 2025 01:00 pm
-
वाई बस स्थानकासमोर अपघात ,एकाचा मृत्यू चार जखमी.
- Sun 11th May 2025 01:00 pm
-
महामार्गावरील खांबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकर व तीन कारचा विचित्र अपघात
- Sun 11th May 2025 01:00 pm
-
शिरवळ जवळ भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी
- Sun 11th May 2025 01:00 pm