एकीव धबधब्या शेजारील कड्यावरून साडेसातशे फूट दरीत पडून दोन युवकांचा मृत्यू

पेट्री : एकीव, ता. जावळी धबधब्यापासून साताऱ्याच्या दिशेकडील डाव्या बाजूस साधारण पन्नास मीटर अंतरावर साडेसातशे फूट खोल दरीत पडून  दोन तरुणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा स्थानिकांच्या मदतीने पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने दोन्ही तरुणांचे मृतदेह दरीतून वर काढले.

जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी साताऱ्यातील युवकांचे दोन ग्रुप आले होते. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान दोन्ही गटांत वादावादी होऊन धबधब्यापासून साताऱ्याच्या दिशेला डावीकडील बाजूस साधारण पन्नास मीटर अंतर परिसरातील साडेसातशे फूट खोल दरीत दोन युवक कोसळले. यामध्ये अक्षय शामराव आंबवणे (वय २८, बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) तसेच गणेश फडतरे (वय ३५, करंजे, ता. सातारा) हे दोन युवक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तरुणांच्या वादावादीतून ढकलून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमद्वारे रात्री उशिरा शोधमोहीम सुरू केली. दाट झाडीझुडपे, किर्रर्र अंधारात मुसळधार पावसामुळे शोधमोहिमेत व्यत्यय येत होता. दरम्यान, रात्री दीड वाजता मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांना यश आले. या घटनेची मेढा पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

सातारा न्यूज ने एकीव  धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी या शीर्षकाखाली बातमी प्रसारित करून येथे एक सुरक्षारक्षक नियमावा असे आव्हान केले होते परंतु या बातमीचे दखल घेऊन प्रशासनाने एखादा सुरक्षारक्षक येथे नेमला असता तर ही दुर्घटना टा टाळता आली असती साताऱ्यातील सर्वच धबधब्यांवरती बरीच तरुण मुले आपले जीवाची परवा न करता हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत आहे यातच भर म्हणून सेल्फी काधण्यासाठी काही महिला सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावत आहेत यासाठी प्रत्येक धबधब्यावर एक सुरक्षारक्षक नियमावा अशी प्रत्येक धबधब्यावरच्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे याचा विचार करून प्रशासनाने प्रत्येक धबधब्यावर किमान एक तरी सुरक्षा रक्षक नियमावा यामुळे अशा घटना घडणार नाहीत

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला