भूस्खलनाचा 140 गावांना धोका; 500 कुटुंबांचं होणार पुनर्वस

सातारा : सातारा जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या ४१ गावांचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यापैकी १५ गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला असुन त्यापैकी पाटण तालुक्यातील आठ व सातारा तालुक्यातील एका गावाचे पुनर्वसनाचे काम सुरू आहे. 

४९९ कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी साडेनऊ हेक्टर जागेचा वापर केला जाणार असून, एमएमआरडीएकडून हे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात १५ गावांचे पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ९६ गावांचा सर्व्हे होणार आहे. त्यामध्ये भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन होणार आहे. मागील वर्षी पावसाळ्यात पाटण, वाई, जावळी, महाबळेश्‍वर तालुक्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शासनाने सर्वच ठिकाणी धोकादायक गावांचा सर्व्हे केला होता. त्यामध्ये १४० गावे धोकादायक असल्याचे समोर आले होते.

पहिल्या टप्प्यात ४१ गावांचा सर्व्हे झाला. त्यातील १५ गावांचे तातडीने पुनर्वसनाचा निर्णय झाला असुन. त्यामध्ये पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी या सात गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार कोटींचा निधी उपलब्ध केला होता. त्यामध्ये पाटणमधील सात व सातारा तालुक्यातील एक (भैरवगड) असे आठ गावांचा पुनर्वसनाचे काम सुरू आहे. या गावांतील लोकांना घरे लवकरच बांधून दिली जाणार आहेत. यानंतर जिल्ह्यातील डोंगरी भाग असलेल्या सर्वच तालुक्यांतील भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांचा सर्व्हे करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाटण व सातारा तालुक्यातील गावांचे पुनर्वसन होत आहे. 

त्यानंतर महाबळेश्‍वर तालुक्यातील पाच, जावळीतील एक वाई तालुक्यातील दोन गावांच्या पुनर्वसनाबाबतची कार्यवाही लवकरच होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ९६ गावांचा सर्व्हे होणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्षात स्थलांतरणाची गरज असलेल्या गावांचेच पुनर्वसन होणार आहे. सध्या भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला