कासजवळ अपघातात साताऱ्यातील दोन अल्पवयीन तरुण ठार

सातारा : साताऱ्याहून कासकडे कारमधून फिरण्यासाठी जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली. यात दोन तरुण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास झाला.

अरहान फैजल शेख (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा), सोहेल अन्सारी (१८, रा. बुधवार पेठ, सातारा) अशी जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील पाच तरुण कारने कासला फिरण्यासाठी जात होते. कास येथील वुड्स रिसाॅर्टजवळ हे तरुण पोहोचले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चाैघेही गंभीर जखमी झाले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. 

जखमी तिघांना काही नागरिकांनी तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचे दृश्य थरकाप उडविणारे होते. एका तरुणाचे डोके डांबरी रोडवर आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता. हा अपघात अतिवेगामुळे झाला असल्याचे समोर येत आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला