चारच महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा वडगाव नजीक भीषण अपघातात मृत्यू..

चार महिन्याच्या सुखी संसाराचा झाला शेवट

 माण : लग्नाला अवघे चार महिने झालेले...दोघांच्याही अंगावरची हळद अजूनही पिवळी असतानाच तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि त्यानंतर काही वेळातच तिनेही जीव सोडला.ही घटना कुठल्या सिनेमातील नव्हे तर माण तालुक्यात प्रत्यक्षात  घडलीय..वडगाव जवळ ओम्नी आणि दुचाकीचा गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला.अन होत्याच नव्हतं झालं.दीपक आणि अक्षदा यांनी रंगवलेल्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
            वारुगडचा दीपक जाधव आणि किरकसालची अक्षदा चव्हाण हे गेल्या नोव्हेंबरमध्येच विवाह बंधनात अडकले होते.दोघंही सुखी संसाराची सोनेरी स्वप्नं पाहत असतानाच काल संध्याकाळी अघटित घडलं.फलटण दहिवडी मार्गावरून दुचाकीवरून घरी निघालेल्या दीपक व अक्षदा जाधव यांचा समोरून येणाऱ्या ओम्नीच भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार दीपक व अक्षदा तसेच ओम्नी चालक गंभीर जखमी झाले.अपघातानंतर काही वेळातच दिपकचा मृत्यू झाला.गंभीर अक्षदाला उपचारासाठी साताऱ्याला हलविण्यात आलं होतं.मात्र नियतीने तिचं कुंकू पुसून अवघे काही तास उलटले नसतानाच अक्षदाने देखील जगाचा निरोप घेतलाय.या अपघातात दोन जीवांच्या मृत्यू बरोबरच सुखी संसाराच्या स्वप्नांचाही चुराडा झाला
             एकाच वेळी पती पत्नीचा मृत्यू झाल्याच्या या हृदयदावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला