फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण: फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक दिनांक 16 मार्च 2026 रोजी होत असून या निवडणुकीसाठी असणारे निवडणूक निर्णय अधिकारी फलटणच्या उपविभागीय अधिकारी तथाप्रांत सौ प्रियांका आंबेकर यांच्या ऐवजी दुसरा निवडणूक निर्णय अधिकारी द्यावा अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री चंद्रकांत दादा जाधव यांनी जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांच्याकडे दि. 10 मार्च 2020 रोजी केली आहे. 

  नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सोळा सदस्यांच्या पैकी शिवसेना आठ आणि भाजप राष्ट्रवादी आठ असे समसमान संख्याबळ झाल्यामुळे सभापतीपदाची निवडणूक ही चिट्ठीद्वारे होणार की अजून काही नियमानुसार होणार अशी चर्चा फलटण तालुक्यात चालू असतानाच श्री चंद्रकांत दादा जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी  बदलण्याची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर शिवसेना च्या वतीने प्रश्नचिन्ह  निर्माण केले आहे. 

सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री चंद्रकांत दादा जाधव यांनी सातारा जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक श्री विराज खराडे यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे मागणी केली आहे की सभापती पदाची निवड ही सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत आणि संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग करण्यात येऊन सभापती निवडीमध्ये पारदर्शकता असावी यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सौ. प्रियांका आंबेकर यांच्या ऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन ही सभापती पदाची निवड व्हावी अशी मागणी केली आहे.

या मागणीवर सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील आता काय निर्णय घेणार याकडे सर्व फलटण तालुक्याचे लक्ष वेधून राहिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला