स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष समीर राजेघाडगे यांच्या पुढाकारातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटपSatara News Team
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
- बातमी शेयर करा
सातारा : स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत नव्हे, तर समाजातील वंचित घटकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचा दिवस… याच भावनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे जिल्हाध्यक्ष समीर राजेघाडगे यांनी स्वातंत्र्य दिनी रिमांड होममधील विद्यार्थ्यांसाठी माणुसकीची अनोखी सलामी दिली.
समीर राजेघाडगे यांच्या पुढाकारातून सातारा येथील शासकीय बाल सुधारगृहातील (रिमांड होम) गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक या सामाजिक उपक्रमाचे खरे समाधान ठरले.
समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या शिक्षणाला बळ देणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. याच सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना गणवेश देताना त्यांच्या शैक्षणिक भवितव्याला शुभेच्छा देत ‘शिक्षणाच्या वाटेवर कोणताही विद्यार्थी साधनांच्या अभावामुळे मागे राहू नये’, हा संदेश समीर राजेघाडगे यांनी दिला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रिमांड होममधील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची भूमिका समीर राजेघाडगे यांच्या या उपक्रमातून अधोरेखित झाली.
यावेळी युवा नेते साहिलबाबा शिंदे, प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, किसान सेलचे अध्यक्ष अतुल शिंदे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत शिर्के, तसेच तेजस जाधव, उदय जाधव, मंगेश ढाणे, किरण पाटील, श्रीजीत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंग्याला सलामी देतानाच गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा समीर राजेघाडगे यांचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 15th Aug 2026 03:16 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 15th Aug 2026 03:16 pm













