पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
Satara News Team
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
- बातमी शेयर करा
पाचगणी : पाचगणीतील स्वच्छ भारत पॉइंट परिसरातील डोंगरउतारावर कचरा आढळल्याप्रकरणी तक्रार समोर आल्यानंतर स्वच्छता व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ठेकेदाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नगरपरिषदेकडून वैज्ञानिक पद्धतीने कचरा हटविणे, प्रदूषण नियंत्रण मंडळासह पाहणी, सीसीटीव्ही बसविणे आणि भविष्यात अवैध डंपिंग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रश्न आहे की, करारानुसार कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नेमकी कशी पार पाडली जात होती?
जर नियमित कचरा संकलन आणि योग्य विल्हेवाट होत होती, तर डोंगरउतारावर कचरा कसा पोहोचला? संबंधित यंत्रणेकडून वेळोवेळी तपासणी झाली होती का? करारातील अटींचे पालन झाले की नाही, याची पडताळणी होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या पाचगणीत कचरा व्यवस्थापनातील कोणतीही त्रुटी ही केवळ प्रशासकीय बाब नसून पर्यावरण, पर्यटन आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आश्वासने न देता करारातील जबाबदाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करून, त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे—कचरा व्यवस्थापनाचा ठेका म्हणजे फक्त बिले उचलण्याचा करार नाही; तर पाचगणीचे पर्यावरण आणि पर्यटन प्रतिमा जपण्याची जबाबदारीही आहे. त्यामुळे या प्रकरणात वस्तुस्थिती समोर आणून जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 23rd Jul 2026 08:36 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 23rd Jul 2026 08:36 am













