मशिनरी स्क्रॅपिंग जगतात ‘रोशन इंटरप्रायझेस’चा डंका; वर्धनगडचे सुपुत्र शकील शिकलगार यांचे औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य
निसार शिकलगार- Tue 21st Jul 2026 01:01 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : औद्योगिक क्षेत्रात आपल्या अचूक आणि कुशल कामाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे अत्यंत आव्हानात्मक असते. मात्र, मूळचे वर्धनगड (ता. खटाव) येथील रहिवासी असलेल्या शकील शिकलगार यांनी आपल्या अपार मेहनत आणि बुद्धीकौशल्याच्या बळावर हे साध्य केले आहे. पुणे-चिंचवड (थेरगाव) येथील ‘रोशन इंटरप्रायझेस’ या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मशिनरी स्क्रॅपिंग क्षेत्रात महाराष्ट्रासह परराज्यांतही आपला मोठा नावलौकिक व दबदबा निर्माण केला आहे.
अचूक कामाच्या जोरावर मिळवला नावलौकिक
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अवजड आणि महागड्या मशिनरी काही कालावधीनंतर अचूक कार्यक्षमतेसाठी (फेस टू फेस येण्यासाठी) स्क्रॅपिंग व क्लीनिंग करणे अत्यंत गरजेचे असते. हे काम शंभर टक्के अचूकतेने करणे अत्यंत जोखमीचे आणि जबाबदारीचे असते. शकील शिकलगार यांच्या 'रोशन इंटरप्रायझेस'ने या क्षेत्रात तंतोतंत काम करून एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. त्यामुळेच आज मशिनरी जगतात एक कुशल कारागीर आणि यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
कुशल कामगारांची निर्मिती अन् रोजगार उपलब्ध
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लहानपणापासूनच स्क्रॅपिंग क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न शकील शिकलगार यांनी उराशी बाळगले होते. हे क्षेत्र केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांनी अनेक तरुणांना याचे प्रशिक्षण देऊन 'स्किल वर्कर' (कुशल कामगार) म्हणून घडवले आहे. आज त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून अनेक हातांना रोजगार मिळाला असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर चालत आहे.
लहान वयातच आदर्श कुटुंबवत्सलता
एकत्र कुटुंबाचा भक्कम आधार
व्यावसायिक यशापलीकडे शकील शिकलगार यांनी कौटुंबिक पातळीवर जपलेले संस्कार आणि आदर्श आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांचे वडील, दोन चुलते, चुलती, आई, आत्या, थोरला व धाकटा भाऊ आणि चुलत भाऊ-बहिणी असा त्यांचा एकत्र राहणारा खूप मोठा परिवार आहे. त्यांच्या एका चुलत्यांनी हायकोर्टात नामांकित वकील म्हणून तर दुसऱ्या चुलत्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून यशस्वी सेवा बजावली आहे.
सर्व कुटुंब मध्यमवर्गीय पार्श्वभूमीचे असतानाही, शकील यांनी अत्यंत लहान वयात संपूर्ण घराची सूत्रे आपल्या हातात घेतली. आजच्या काळात जिथे एक अपत्य असणारी छोटी कुटुंबेही विभक्त होताना दिसतात, तिथे एवढ्या मोठ्या परिवाराला एकत्र ठेवणे, सर्वांना सोबत घेऊन चालणे आणि संपूर्ण कुटुंबाचा गाडा खंबीरपणे हाकणे ही मोठी वकौतुकास्पद हातोटी शकील यांनी दाखवून दिली आहे. कुटुंबाप्रती असलेली ही एकनिष्ठा आणि कर्तव्यभावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उंच करते.
‘ एक हात डफली’च्या युगात गुप्त दातृत्वाची आदर्श परंपरा
आजच्या काळात छोटीशी मदत करूनही त्याचा मोठा दिंडोरा पिटण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असताना, शकील शिकलगार यांनी मात्र 'उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू नये' या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेली १० वर्षे ते अखंडपणे अत्यंत गुप्त रीतीने गरीब, गरजू आणि होतकरू कुटुंबांना आर्थिक व अन्नधान्याच्या स्वरूपात मोठी मदत करत आहेत. नुकतेच त्यांनी एका सामाजिक व धार्मिक कार्यातही सढळ हाताने मदत केली आहे, मात्र त्याचा कोणताही गाजावाजा त्यांनी केला नाही. प्रसिद्धीचा कोणताही लवलेश न ठेवता, केवळ समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेपोटी ते हे कार्य करत आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक यश, कौटुंबिक जबाबदारी पेलण्याचे कसब आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे हे गुप्त दातृत्व आजच्या घडीला अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. वर्धनगडसारख्या ग्रामीण भागातून येऊन थेट औद्योगिक नगरीत आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या या सुपुत्राचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 21st Jul 2026 01:01 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 21st Jul 2026 01:01 pm













