खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांचा उत्तर कोरेगाव तालुक्याचा दौरा

वाठार स्टेशन : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज वसना उपसा सिंचन योजनेची पाहणी करुन योजनेतील ञुटी तसेच योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबत संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शहाजी भोईटे, संचालक दत्तात्रय धुमाळ, पुणे कर्मशियल बॅकेचे उपाध्यक्ष विजय चव्हाण युवानेते कुमार भोईटे,भाजपा युवा मोर्चाचे मयूर धुमाळ,नंदकुमार यादव योगेश कर्पे आदी उपस्थित होते.
      कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वरदायिनी असलेल्या वसना उपसा सिंचन योजनेमध्ये वंचित गावांचा समावेश व्हावा तसेच योजनेच्या देखभाल दुरूस्तीची कामे वेळेत होऊन योजना पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित राहवी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.त्याअनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज संबंधित योजनेची पाहणी  केली.यावेळी त्यांनी या योजनेमध्ये वंचित गावांचा समावेश करून योजनेची व्याप्ती वाढवावी,तसेच उपसा सिंचनासाठी सौर उर्जेचा वापर करावा याबाबत वसना उपसा सिंचन योजनेचे उपविभागिय अधिकारी आर.एन.पिसाळ शाखा अभियंता जे.एस् कदम ,मोपे व सहकारी यांच्याशी शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.
      दरम्यान या वेळी वसना उपसा सिंचन योजनेचे उपविभागिय  अभियंता आर्.एन पिसाळ शाखा अधिकारी जे.एस कदम,मोपे व सहकारी यांनी  योजनेच्या सद्यस्थितीतील कार्याची सविस्तर माहिती दिली तसेच योजनेशी संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून त्यांनी केलेल्या सूचनांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मकता दाखविली

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला