एक तास लाॅजवर चल नाहीतर तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो म्हणून युवतीला ब्लॅकमेल करणाऱ्या युवकाला निर्भया पथकाने घेतले ताब्यात
निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे संशयित युवक अलगद जाळ्यातSatara News Team
- Mon 4th Jul 2022 09:36 am
- बातमी शेयर करा
निर्भया पथकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे संशयित युवक अलगद जाळ्यात सापडला.त्यानंतर संबंधित युवकास सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून सदर युवतीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे
सातारा न्यूज ; सातारा /सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीला मोबाईलवर अश्लील मेसेज करून तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने लॉजवर घेऊन जाणाऱ्या युवकाला निर्भया पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. अक्षय रमेश मदने (वय- 25, रा. राजापूर ता खटाव जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मदने या युवकाने संबंधित युवतीला 30 जून रोजी तिच्या मोबाईलवर मेसेज करत तिला ‘तुझे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते डिलीट करायचे असतील. तर तू माझ्याबरोबर एक तास लॉजवर यायचं आणि नाही, आलीस तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन, असे मेसेज करत धमकावण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील घाबरलेल्या युवतीने निर्भया पथकास घडलेली हकीकत सांगितली व आपला तक्रार अर्ज दिला. सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेवरून यावरून घटनेचे गांभीर्य ओळखून त्या अनोळखी युवकास ताब्यात घेण्यासाठी शक्कल लढवत सापळा रचला. संबंधित युवतीला तिच्या मोबाईलवरून त्या युवकास मेसेज करत भेटण्यास सांगितले.
संबधित युवकाने युवतीला थेट लॉजवरच जाण्याचा आग्रह धरला. तिला दुचाकीवर बसवून जिल्हा न्यायालयाच्या आवारात आला. यावेळी निर्भया पथकाच्या राठवडे आणि माने यांनी संबंधित युवकास ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव अक्षय रमेश मदने (वय 25, रा. राजापूर ता खटाव जि. सातारा) असे सांगतले. त्यानंतर संबंधित युवकास सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून सदर युवतीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. निर्भया पथकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे संशयित युवक अलगद जाळ्यात सापडला.
nirbhaya
police
lcrimer
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 4th Jul 2022 09:36 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 4th Jul 2022 09:36 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 4th Jul 2022 09:36 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 4th Jul 2022 09:36 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 4th Jul 2022 09:36 am
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Mon 4th Jul 2022 09:36 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Mon 4th Jul 2022 09:36 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Mon 4th Jul 2022 09:36 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Mon 4th Jul 2022 09:36 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Mon 4th Jul 2022 09:36 am
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Mon 4th Jul 2022 09:36 am
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 4th Jul 2022 09:36 am
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Mon 4th Jul 2022 09:36 am












