फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण शहर परिसरात शस्त्रांचा वापर करून मारामारी, मालमत्तेविरुद्ध गुन्हे, चोरी तसेच दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोघा आरोपींना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

ही कारवाई सातारा पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीप्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे (वय २२, रा. स्वामी समर्थ मंदिर रोड, मलटण, फलटण) तसेच त्याचा साथीदार अर्जुन राजू जाधव (वय १९, रा. स्वामी समर्थ मंदिर रोड, मलटण, फलटण) हे अवैध मार्गाने दहशत निर्माण करून दुखापत पोहोचवणे, चोरी करणे, अवैध शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते.

फलटण शहर पोलीस ठाण्याने या दोघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भविष्यातही सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला