हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
राजेंद्र बोंद्रे- Sat 14th Feb 2026 08:49 pm
- बातमी शेयर करा
फलटण : गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत हॉटेल व्यवसायिकाला खोलीत अडकवून मारहाण करत ४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत टोळीचा फलटण शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पर्दाफाश करून पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी श्री. आनंद काशिनाथ दळवी (रा. कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे) यांना एका महिलेने मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुधवारी पेठ, फलटण येथील लॉजवर बोलावून घेतले. तेथे आरोपींनी कट रचून फिर्यादीला खोलीत अडकवले, शिवीगाळ व मारहाण करून “तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू” अशी धमकी दिली.
आरोपींनी फिर्यादीकडून ४० लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ लाख १५ हजार रुपये रोख तसेच एटीएम व क्रेडिट कार्डद्वारे जबरदस्तीने पैसे घेतले. पुढे पुण्याला सोडण्याच्या बहाण्याने रस्त्यात गाडी अडवून फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे २० तोळे वजनाची, अंदाजे ३० लाख रुपये किमतीची सोन्याची साखळीही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून संशयितांचा शोध घेतला. दोन तासांच्या आत पोलिसांनी साहिल रवी तारे (रा. दत्तनगर, फलटण), वैभव बाळासो सस्ते (सस्तेवाडी , ता. फलटण), रोहन नवीन काकडे (मंगळवार पेठ, फलटण), विनायक बाळासो जाधव आणि राज राम बोके (रा. माळवाडी पेठ, फलटण) यांना ताब्यात घेत अटक केली.
सदर कारवाई माननीय पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक रणजीत सावंत ,उपविभागीय अधिकारी वडूज अतिरिक्त कार्यभार फलटण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे पोलीस अमलदार नानासो होले, नितीन सजगणे, संतोष नाळे ,जितेंद्र टिके, काकासो कर्णे,अतुल बडे, मुकेश घोरपडे ,महेश जगदाळे ,निखिल गायकवाड, जयदीप यादव, गणेश अवघडे, विक्रम कुंभार यांनी केलेली आहे
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 14th Feb 2026 08:49 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 14th Feb 2026 08:49 pm












