फलटण येथे भाऊ बहीणी चा खून
फलटण येथे भाऊ बहीणी चा खूनSatara News Team
- Sat 25th May 2024 01:42 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरच्या घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सिकाबाई तुकाराम शिंदे (वय ३०) व सुमित तुकाराम शिंदे (१६) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. दिनांक २५ रोजी शनिवारी सकाळी उघडकीस आली असता ग्रामीण पोलिसांना याबाबत अवगत करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कामी सूचना दिल्या. हा खून कोणी व का केला याचा पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंचनामा करण्याची कारवाई करीत आहेत. दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फलटण ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पंचनामा करीत आहेत. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
#crime
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 25th May 2024 01:42 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 25th May 2024 01:42 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 25th May 2024 01:42 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 25th May 2024 01:42 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 25th May 2024 01:42 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 25th May 2024 01:42 pm
संबंधित बातम्या
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Sat 25th May 2024 01:42 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Sat 25th May 2024 01:42 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Sat 25th May 2024 01:42 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Sat 25th May 2024 01:42 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Sat 25th May 2024 01:42 pm
-
पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराची शिरवळ चौकात जाहीर धिंड
- Sat 25th May 2024 01:42 pm
-
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 25th May 2024 01:42 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Sat 25th May 2024 01:42 pm












