कास रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू
Satara News Team
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
- बातमी शेयर करा
कास : कास रस्त्यावर कासाणी गावानजीक वळणावर दुचाकी घसरुन खाली पडल्याने झालेल्या अपघातात गणपतराव रतन कांबळे (वय 53, रा. अतित, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. यामध्ये दुचाकीचालक जखमी झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी ही अपघाताची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या घटनेमध्ये नागठाणे येथील बळीराम बाजीराव साळुंखे (वय 48) व गणपतराव कांबळे (रा. अतित) हे दोघे दुचाकीवरुन बामणोलीला चालले होते. सातारा ते कास रस्त्यावर कासाणी गावाच्या हद्दीत वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर पडली. यावेळी पाठीमागे बसलेले गणपतराव कांबळे तसेच बळीराम साळुंखे दोघेही रस्त्यावर पडले. त्यात गणपतराव कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर बळीराम साळुंखे जखमी झाले होते.
अपघातानंतर तेथून निघालेल्या वन विभागाच्या वाहनाने त्यांना तातडीने मदत केली. बळीराम साळुंखे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची घटना कळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दुचाकी निष्काळजीपणे चालवून कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक बळीराम साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वायदंडे तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Wed 22nd Nov 2023 10:55 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Wed 22nd Nov 2023 10:55 am













