करहर ता.जावली येथे भाजपाच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत "मन की बात" चे आयोजन .
ओमकार सोनावणे
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
- बातमी शेयर करा
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 'मन की बात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सातारा - जावली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे व करहर विभागातील आशा सेविका तसेच करहर विभागातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या बहुसंख्य उपस्थितीत मन की बातचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात विविध भागात सामान्य लोकांनी राबवलेले मधूमक्षिका पालनासारखे विविध कार्यक्रम सांगितले.
भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात असून , येत्या १३ ते १५ आँगस्ट पर्यत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच कुठेही तिरंगा झेंडा कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी.घरोघरी तिरंगा हा उत्सव मोठ्या अभिमानाने सर्वांनीच सहभाग नोंदवावा. शाळा,सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी जाऊन घरोघरी अभियान राबविण्यासाठी प्रबोधन करावे. पदाधिकाऱ्यांनी कसलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले.
येणाऱ्या सर्वच निवडणूका भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवल्या जातील त्या दृष्टीने भाजपा पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. भाजपाची धेय्य धोरणे प्रत्येक बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहचवावीत.
आशा सेविकांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक सहकार्य असून, आता सरकार आल्यामुळे मानधन वाढीसाठी ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे आशा स्वयंसेविकांच्या शिष्ठमंडळास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आश्वासन दिले.
तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी प्रस्तावना मांडली तर माजी उपसभापती रविंद्र परामणे यांनी आभार माणले. प्रमोद शिंदे , उपाध्यक्ष किरण भिलारे, प्रदिप बेलोशे, अविनाश पवार, दिपक गावडे, भाईजी गावडे, संजय बिरामणे, राजेंद्र गोळे, गोरख महाडिक, देवेंद्र राजपूरे, मोनिका परामणे,पिंपळीच्या माजी सरपंच सौ निलिमा अविनाश पवार तसेच आशा सेविका शिष्ठमंडळातून सौ पौर्णिमा श्रीहरी गोळे, मंगल पांगारे, अरूणा शिर्के, वर्षा भिसे, कल्पना इंदलकर, मोनाली नवसरे, वैशाली तरडे, मिनाक्षी नवसरे, राणी परामणे आदी सेविका उपस्थितीत होत्या.
bjp
shivendrraje
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Sun 31st Jul 2022 12:12 pm
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Sun 31st Jul 2022 12:12 pm











