विज्ञानसाठी 96 तर वाणिज्य 84 टक्के मेरीट..अकरावी प्रवेशाची पहिली कट ऑफ प्रसिध्द
कोमल पवार
- Thu 21st Jul 2022 10:06 am
- बातमी शेयर करा
सातारा ; सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली कट ऑफ प्रसिध्द झाली. त्यामध्ये सायन्स शाखेसाठी जोरदार रस्सीखेच होत आहे. सातारा शहरात सायन्स कॉलेजला खुल्या प्रवर्गासाठी 90 टक्के तर सयाजीराव विद्यालयात 96.60 टक्के, लालबहादुरशास्त्री महाविद्यालयात 82.30 टक्क्यापर्यंत मेरीट लागले आहे. विज्ञान पाठोपाठ वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत असून धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात 84.20 टक्के तर छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कला शाखेसाठी मागेल त्याला प्रवेश दिला जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात 37 हजार 944 विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची माध्यमिक शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार बुधवारी पहिली कट ऑफ लिस्ट प्रसिध्द झाली. सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी खुला 90 टक्के, एस.सी. 73.20 टक्के, एसटी. 51.60 टक्के, व्ही.जे. ए. 77.60 टक्के, एन.टी. बी 78.80 टक्के, एनटी सी . 84.20 टक्के, एन.टी.डी. 69.20 टक्के, एस.बी.सी. 64.20 टक्के, ओबीसी 80.20 टक्के, ईडब्ल्यूएस 86.60 टक्के, माजी सैनिक व स्पोर्टसमध्ये खुला 86.60 टक्के, व्ही.जे. ए. 71.40 टक्के, एन.टी.बी. 80 टक्के, एन.टी.सी. 88 टक्के, ओबीसी 80.60 टक्के मेरीट लागले आहे. महाराजा सयाजीराव विद्यालयात विज्ञान शाखेसाठी खुला मुलांसाठी 96.60 टक्के व मुलींसाठी 95.40 टक्के, एस.सी. 93.40 टक्के, एसटी 82.80 टक्के, व्ही.जे..ए. 88.40 टक्के, एन.टी.बी 93.60 टक्के, एन.टी.सी. 94.60 टक्के, एसबीसी 90 टक्के, ओबीसी 93.80 टक्के, एनटीडी 77.40 टक्के, अंपग 86.60 टक्के, आजी-माजी सैनिक 95.20 टक्के. परिसर शाळा खुला 93.80 टक्के. वाणिज्य शाखेसाठी खुला प्रवर्ग मुले 82 टक्के, मुली 85.20 टक्के, एस.सी.75 टक्के, व्ही.जे.ए. 60 टक्के, एन.टी.बी 65.20 टक्के, एन.टी.सी.68.6 टक्के, ओबीसी 79 टक्के, एसबीसी 83 टक्के, आजी-माजी सैनिक 81.20 टक्के, ईडब्ल्यूएस.79.80, परिसर 77.60 टक्के मेरीट लागले असून कला शाखेसाठी खुला 55.50 टक्के मेरीट लागले आहे. धनजंयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात खुला 84.20 टक्के, एस.सी. 57.80 टक्के, अपंग 57.20 टक्के, व्ही.जे.ए.69.80 टक्के, एन.टी.बी. 69.20 टक्के, एन.टी.सी. 63 टक्के, एन.टी.डी. 71.20 टक्के, एस.बी.सी. 63.60 टक्के, ओबीसी 64.60 टक्के, ईडब्ल्यूएस 77.20 टक्के, खेळाडूंसाठी 50 टक्के मेरीट लागले आहे.
लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी खुला 82.20 टक्के, ईडब्ल्यूएस 56 टक्के, एस.सी. 51.40 टक्के, एस.टी. 65 टक्के, व्ही. जे. ए 56.40 टक्के, एन. टी. बी 63.20 टक्के, एन. टी. सी 54.80 टक्के, एन.टी.डी. 77.40 टक्के, ओबीसी 52.20 टक्के, एस.बी.सी 59.20 टक्के, वाणिज्यशाखेसाठी खुला 64.2 टक्के, ईडब्ल्यूएस 62.4 टक्के, एस.सी. 48.4 टक्के, व्ही.जे. ए.48.2 टक्के, एन. टी. बी 42.2 टक्के, एन. टी. सी 45.4 टक्के, ओबीसी 50.04 टक्के अशी पहिली कट ऑफलिस्ट लागली आहे. भवानी विद्यालयामध्ये विज्ञानशाखेसाठी खुला 87.80 टक्के, ईडब्ल्यूएस 79 टक्के, एस.सी. 572.40 टक्के, व्ही.जे. ए 68 टक्के, एन. टी. बी 71.40 टक्के, एन. टी. सी. 74 टक्के, ओबीसी 72.20 टक्के, एस.बी.सी 87.80 टक्के मेरीट लागले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये कला शाखेला मात्र प्रवेश अर्ज कमी आल्याने मागेल त्याला प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या प्रवेश गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना गुरुवार दि. 21 जुलै रोजीपासून प्रत्यक्ष प्रवेश दिले जाणार आहेत. तसेच या यादीतील प्रवेश शिल्लक राहिल्यास प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
collage
LBS
SHIVAJI
YC
Cyclone
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 21st Jul 2022 10:06 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 21st Jul 2022 10:06 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 21st Jul 2022 10:06 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 21st Jul 2022 10:06 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 21st Jul 2022 10:06 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 21st Jul 2022 10:06 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 21st Jul 2022 10:06 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 21st Jul 2022 10:06 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 21st Jul 2022 10:06 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 21st Jul 2022 10:06 am













