राष्ट्रवादी पक्षाच्या कारवाई बरोबर आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे निलंबन करण्याची केली मागणी

 सातारा: साताऱ्यातील भाजप जिल्हा पदाधिकारी बैठक पश्चिम संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थित पार पडली या बैठकीत सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या अभिनंदन ठरावाबरोबरच माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची बैठकीत चर्चा पार पडली यामध्ये माढा लोकसभेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाने माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केल्यामुळेच हा पराभव झाल्याचा अहवाल यावेळी पश्चिम संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला. या अहवालात राष्ट्रवादी पक्षाच्या कारवाई बरोबरच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे निलंबन करावे अशी मागणी ही करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला