साताऱ्यात ओबीसींचे जिल्हा अधिवेशन संपन्न

सातारा : भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना नई दिल्ली संलग्न सातारा जिल्हा ओबीसी संघटना यांच्यावतीने सातारा जिल्हा अधिवेशन येथे आयोजित करण्यात आले आहे.
 या मेळाव्यात ओबीसी सर्व जातीच्या जनगणना करणे आवश्यक आहे, या विषयावर जातीच्या जनगणनेचे फायदे काय आहेत ? आरक्षणाचे धोरणे काय आहेत दारिद्र्यरेषेतील लोकांसाठी योजना हे प्रलंबित प्रश्न  सोडवण्यासाठी जनगणना करणे आवश्यक आहे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनची निवड होणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर शैक्षणिक सवलती मिळावे याकरिता आपण पुढाकार घेऊन या विषयाला मार्गी लावणार आहोत. सरपंच परिषद महिलावर होणारे अन्याय अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण आपली संघटना यापुढे लक्ष घालणार आहे.  मेळाव्यात ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ केंद्रीय राज्य शासकीय निमशासकीय खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटना स्थापना वर्ष 2018 मध्ये करण्यात आली होती. समाजातील प्रत्येकाला ओबीसी साक्षर करणे ध्येय आहे. सामाजिक न्यायाबद्दल समाजामध्ये जाणीव व जागृती निर्माण करणे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपत्कालीन व दीर्घकालीन कार्यक्रम आखण्यात आले असून यामध्ये ओबीसी समाजातील तत्कालीन प्रश्न पासून तर भविष्याच्या ओबीसी हक्काचे रक्षण करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. यासाठी ओबीसी नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जातीनिहायक जनगणना होणे. अत्यंत महत्त्वाचे असून ब्रिटिश काळात 1931 साली जातीनिहाय जनगणना झाली होती. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि विविध शिष्यवृत्ती त्यांचे लाभ मिळण्यासाठी नॉन क्रिमिनलची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न ओबीसी अधिकारी संघ करणार आहे. यावेळी मेळाव्यात अध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे, आणि प्रमुख पाहुणे मायाताई गोरे, सुनीता काळे, सविता हजारे यावेळी उपस्थित होत्या. 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला