माणच्या पत्रकारांमुळे अपघातग्रस्ताला मिळाले जीवदान
एकनाथ वाघमोडे- Thu 5th Jan 2023 01:08 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : माण तालुक्यातील पत्रकारांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त युवकाला जीवदान मिळाल्याची घटना बुधवार दि. ४ जानेवारी रोजी रात्री घडलीय. उकिर्डे घाटात मोहसीन महंमद सय्यद (रा. पिंपोडे खुर्द ता.कोरेगाव) हा युवक दुचाकी क्रमांक (एमएच 11 एझेड 2275) वरून दहिवडी येथे पाहुण्यांकडे निघाला होता. त्यावेळी वाहनावरील ताबा सुटून अपघातग्रस्त झाला. या आवाजाने उकीर्डे येथील कांबळे वस्तीवरील लोकांनी घटनासाठी धाव घेतली.
त्याचवेळी साताऱ्याकडून निघालेल्या माण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन मंगरुळे, सचिव बापूसाहेब मिसाळ, माजी अध्यक्ष संदीप जठार, फिरोज तांबोळी व धनंजय पानसांडे यांना अपघातग्रस्त वाहन दिसताच थांबले. दुचाकी जवळच खड्डयात रक्तबंबाळ होऊन पडलेल्या श्री मोहसीन सय्यद दिसले. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेतून खड्डयातून बाहेर काढून तात्काळ १०८ ला फोन करून ऍम्ब्युलन्स बोलवली. त्याचबरोबर दहिवडी पोलीस स्टेशन, पोलीस पाटील जितेंद्र कांबळे व जखमीच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली. मोहसीन सय्यद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पंधरा मिनिटातच ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्यावर मोहसीन सय्यद यांना पुढील उपचारासाठी साताऱ्याकडे पाठविण्यात आले.
माण तालुक्यातील पत्रकारांच्या सतर्कतेमुळे जखमी मोहसीन सय्यद यांना लवकर उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उकिर्डेचे पोलीस पाटील जितेंद्र कांबळे यांनीही मदत केली.
accidentnearDahivadi
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Thu 5th Jan 2023 01:08 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Thu 5th Jan 2023 01:08 pm













