घरातच सर्व पदे घेताय, वाई मधील इतर कार्यकर्ते काय मेले आहेत का?..पुरुषोत्तम जाधव यांचा मकरंद पाटील यांच्यावर टीकास्त्र

 वाई :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच वाई येथे जनसन्मान मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजितदादांनी पुन्हा एकदा मकरंद पाटील यांना आवाहन वाई तालुक्यातील जनतेला केले. त्यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी थेट आमदार मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकाच घरामध्ये सर्व पदे मग वाई मधील इतर कार्यकर्ते मेले आहेत का? असा सवाल करीत शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी पाटील यांच्यावर टीका केली.

 जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेत नुकताच नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली आहे. 

 स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचेच सत्तेचे विकेंद्रीकरणाचे विचार मोडीत काढून एकाच घरात सगळ्या सत्ता घेऊन जनतेला झुलवत ठेवले आहे. झुंडशाही करणाऱ्या विरोधात आता जनताच पेटून उठली आहे. आता सर्व पक्षातील विरोधकांनी एकच मोट बांधली असून परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला