अबब... सातारा शहरात १३०० हुन आधिक इमारती धोकादायक

सातारा :  पावसाळा सुरू झाला की शहरातील धोकादायक इमारतींचा विषय चर्चेचा ठरतो. सातारा शहरात वयाची शंभरी पार केलेल्या धोकादायक इमारतींची संख्या तीनशेहून अधिक आहे. आजही अनेक नागरिक या इमारतींमध्येच वास्तव्य करीत आहेत. मालक व भाडेकरू यांच्या वादात अनेक इमारती अडकल्याने इमारत सोडली तर हक्क संपुष्टात येईल, अशी भीती येथील रहिवाशांना आहे. त्यामुळे ‘धोका पत्करू; पण इथेच राहू’ अशी परिस्थिती शहरात पाहायला मिळत आहे.

सातारा पालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारतींत राहणाऱ्या मिळकतदारांना नोटीस बजावून इमारत पाडण्याच्या सूचना केल्या जातात. काही इमारतींवर धोक्याचा फलकही लावला जातो. मात्र, न्यायप्रविष्ट बाब असल्याने एकही मिळकदार ही बाब गांभीर्याने घेत नाही.

गेल्या १८ वर्षांत सातारा शहरातील केवळ ५० मिळकतदारांनी आपल्या धोकादायक इमारती स्वत:हून पाडल्या आहेत. सातारा शहरात धोकादायक व अतिधोकादायक अशा वर्गवारीतील इमारतींची संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे. पालिकेच्या नोंदीनुसार धोकादायक इमारतींच्या संख्या ३०० हून अधिक आहे.

धोकादायक इमारतींत १५००नागरिक
सातारा शहरातील धोकादायक इमारतींची संख्या मोठी असली, तरी यापैकी जवळपास निम्म्या इमारती बंद अवस्थेत आहेत. उर्वरित इमारतींमध्ये सुमारे दीड हजार नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत.

पालिकेच्या नोटीसीला अल्प प्रतिसाद
इमारती धोकादायक आहेत, अशा मिळकतदारांना पालिकेकडून वेळोवेळी नोटीस बजावून धोक्याची कल्पना दिली जात आहे. गेल्यावर्षी इमारत पाडण्यासाठी लागणारी यंत्रणा पालिकेकडून उपलब्ध करण्यात आली होती.

यासाठी येणारा खर्च मात्र मिळकतधारकाला द्यावा लागणार होता. मात्र, या आवाहनालाही नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. धोकादायक इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने पालिकेला नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कारवाई करता येत नाही.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला