पालिकेकडून सरसकट घरपट्टी आकारणी करून नागरिकांवर अन्याय ...आ . शिवेंद्रराजे भोसले

सातारा : सातारा पालिका हद्दवाढीमध्ये समाविष्ट झालेल्या शाहूनगर- गोडोली परिसरातील त्रिशंकू भाग, शाहूपुरी येथील नागरिकांना घरपट्टी भरण्याबाबत नगर पालिकेने नोटीस बजावली आहे. दरम्यान, पालिकेने सरसकट आकारणी करून नागरिकांवर अन्याय केला आहे. काही नागरिकांची मातीची घरे आहेत, काहींची पत्र्याची आहेत, अशा नागरिकांनाही वाढीव घरपट्टी आकारली आहे. यासंदर्भात आज पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासोबत आ . शिवेंद्रराजे भोसले यांनी  बैठक घेतली.

नागरिकांना वाढीव घरपट्टी भरण्याची सक्ती न करता, भागनिहाय पाहणी करून जसे घर असेल त्या निकषानुसार मोजमाप घेऊन घरपट्टी आकरण्याच्या सूचना आ . शिवेंद्रराजे यांनी पालिका प्रशासनाला केल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. मुख्याधिकारी बापट यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन भागनिहाय पाहणी करून, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी नगर विकास आघाडीचे सर्व आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला