राज्यात स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात सातारा तिसरा, ९ शाळांची सर्वोत्तमसाठी निवड

सातारा : शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता माॅनिटर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर राज्यात सर्वोत्तम कामगिरी १०० शाळांनी केली आहे. त्यातील ९ शाळा या सातारा जिल्ह्यातील आहेत.  यामुळे सातारा जिल्ह्याने पुन्हा डंका वाजवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्र कचरामुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या पीएलसी माॅनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ आॅक्टोबरला पार पडला. शाळा आणि विद्याऱ्श्यांना स्वच्छता आणि माॅनिटर प्रकल्पात काय करायचे आहे याविषयी हा पहिला टप्पा होता. यामध्ये विद्यार`थी हे स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश देणार दूत नव्हते. तर कळत-नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक माॅनिटर होते. विद्यार`थी वाटेल तेथे कचरा टाकणारे आणि बेफिकीरपणे थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. अशा या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला होता.

या प्रकल्पात राज्यातील ६४ हजार १९८ शाळांनी सहभाग नोंदणी केली होती. यामध्ये ५९ लाख ३१ हजार ४१० विद्याऱ्श्यांचे १५ लाखांहून अधिक व्हिडीओ शेअर झाले. त्यामुळे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेला गती मिळण्याचेच काम झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात विद्याऱ्श्यांना स्वच्छता माॅनिटगिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष केंद्रित होणार आहे. तर या प्रकल्पात सातारा जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच जिल्ह्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी केलेल्या शाळा, सहभागी शाळा, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विद्यार`श्यांचे प्राथिमक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी काैतुक केले आहे.

जिल्ह्यातील सर्वोत्तम ९ शाळा .....

 

गिरीस्थान प्रशाला व ज्युनिअर काॅलेज महाबळेश्वर.,

श्री वडजाईदेवी आदर्श विद्यालय पाटखळ, ता. सातारा.

जिल्हा परिषद शाळा बसाप्पाचीवाडी, ता. सातारा.

त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी, ता. माण.

सरस्वती विद्यालय कोरेगाव. जिल्हा परिषद शाळा हिंगणगाव, ता. फलटण,

जिल्हा परिषद शाळा रांजणी, ता. जावळी.

जिल्हा परिषद शाळा चाफळमुले, ता. पाटण.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड, ता. माण.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला