मुथा फौंड्रीतर्फे आर्यांग्ल हॉस्पिटलला दहा लाखांची देणगी

सातारा  : मुथा फौंड्रीजच्यावतीने श्रीमती विजया मुथा यांच्या ३४ व्या पुण्यतिथी निमित्त आर्यांग्ल हॉस्पिटलला दहा लाखांची देणगी देण्यात आली. यावेळी ना. महेश शिंदे, सौ. पियाताइ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमती विजया मुथा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

मुथा फौंड्रीज सातारा येथे स्वर्गीय श्रीमती विजया मुथा यांच्या 34 पुण्यतिथी निमित्त ना. महेश शिंदे, सौ. प्रियाताई शिंदे, कामगार आदींच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध उपक्रम राबवण्यात आले. एहसास स्कूल, पुरुष भिक्षेकरीगृह, निरीक्षणगृह, आशाभवन, वासोळे शाळा आणि आर्यांग्ल हॉस्पिटल या ठिकाणी खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी सर्वोत्कृष्ठ कामगार, कर्मचारी आणि सिनियर मॅनेजमेंट २०२३ -२४ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कंपनीचे कायमस्वरूपी कामगार संदीप शिंगटे यांचे देखील दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबाबत खास कौतुक करण्यात आले. कौतुक सोहळ्यानंतर आर्यांग्ल हॉस्पिटलला १० लाख रुपये देणगी देण्यात आली.

संचालक मेघना बाफना यांनी आर्यांग्ल हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेतला. जास्तीत लोकांनी या हॉस्पिटलसाठी देणगी देण्याबाबत त्यांनी आवाहन केले. यावेळी महेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर रक्तानं शिबिरास सुरुवात झाली. या शिबीरात कामगार, कर्मचारी, मुथा कुटुंबियांनी सहभाग घेतला. रक्तदात्यांना माउली ब्लड बँकेतर्फे सुरक्षा हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले . एकूण ७० लोकांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमासाठी मास पदाधिकारी, मुथा कामगार संघटनेचे पदाधिकारी, मुथा सिनियर मॅनेजमेंट टीम सर्व मुथा कुटुंबीय डायरेक्टर अनूप मुथा, डायरेक्टर मेघना बाफना, रिचा मुथा, श्वेता गांधी व नातवंडे अनया बाफना, अनुष्का मुथा व समर गांधी उपस्थित होते. अजित मुथा व मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर गोसावी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन काजल जगदाळे यांनी केले. मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुख सौ. शकुंतला पवार यांनी आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला