पाचगणीत बारबालांचा पुन्हा नंगानाच ,,,हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) यथे पोलिसांचा छापा; २० जण ताब्यात

पाचगणी : पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) येथे बारबालांच्या नंगानाच चालू असताना पोलिसांनी मारलेल्या छाप्यात २० जणांना घेऊन २४ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातारा जिल्ह्यातील वगतिक वारसा लाभलेल्या पर्यटनस्थळी अशे अवैध धंदे रोजरोसपाने सुरु असून यावर वाचक म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अशा प्रकारांवर वाचक बसण्यासाठी धडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस दलाला दिल्या होत्या. 


त्यानुसार पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील हॉटेल हिराबागच्या हॉलमध्ये गायिकांच्या व महीला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालक यांनी वेगवेगळया ठिकाणाहुन 12 महिला आणल्या असून त्या गाण्यांच्या तालावर अश्लील हावभाव करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि पवार व सोबत पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व त्याचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले.

 पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) चे हॉलमध्ये छापा टाकून सदर हॉटेलच्या हॉलमध्ये जावुन पाहीले असता 12 बारबाला आळीपाळीने येवुन तोकड्या कपडयात तेथे सुमारे 20 गिऱ्हाईकांच्या समोर उभ्या राहुन अश्लील हावभाव करुन गिऱ्हाईकांच्या जवळ जावुन त्यांचेशी लगट करीत असल्याचे दिसले. सदर बारबालाच्या या कृत्यावर गिऱ्हाईक इसम आनंद घेवुन त्यांचे सोबत नृत्य करीत होते. हे निदर्शनास आले असता 20 जणांना ताब्यात घेतले त्यामध्ये हॉटेल मालकासह इतर 20 लोकांवर गुन्हा दाखल केला असुन सदर ठिकाणाहुन साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण 25 लाख 45 हजार 500 रुपयांचे साहीत्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दिलीप पवार हे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला