शिक्षकांबद्दल कायम कृतज्ञता हाच आपला धर्म ... अजित साळुंखे
सतिश जाधव
- Tue 6th Sep 2022 04:27 am
- बातमी शेयर करा

देशमुखनगर : शिक्षक होण्याचा अनुभव हा अतिशय सुखद असून अध्यापनाचा आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. शिक्षक दिन साजरा करणे व ऋण व्यक्त करणे हे आजच्या दिवसापुरते मर्यादित न ठेवता शिक्षकांप्रती कायम कृतज्ञता बाळगणे हाच आपला धर्म मानला पाहिजे.
असे उदगार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेंद्रे येथील अजिंक्यतारा सूतगिरणीचे संचालक अजित साळुंखे यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेज,नागठाणे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी
ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे .प्राचार्य डॉ.अजितकुमार जाधव हे होते.
अजित साळुंखे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मित्रत्वाचे नाते असले पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजितकुमार जाधव आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही शिक्षकांची संस्था असून या संस्थेतील शिक्षक हा अभ्यासू , व्यासंगी, चिंतनशील,संयमी, विद्यार्थी प्रिय इत्यादी गुणांनी सर्व गुण संपन्न असावा. नागठाणे महाविद्यालयाने
नॅकमध्ये मिळविलेल्या यशावरून गुरुदेव कार्यकर्त्यांचे सर्वच पातळीवरील योगदान दिसून येते.
शिक्षक ही सेवा नसून ते एक व्रत आहे. ते व्रत आयुष्यभर प्रामाणिकपणे पाळले पाहिजे.
याप्रसंगी प्राध्यापकांच्या वतीने सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष निलाखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने विद्यार्थी प्राचार्य सलीम शेख, कु.तेजस्वी कांबळे कु.शिवांजली जाधव कु.साक्षी भोसले,कु.स्नेहल सोनवले इत्यादी विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बी.ए. आणि बी.कॉमच्या एकूण ३५ विद्यार्थ्यांनी शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका बजावली.
या शिक्षक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजित साळुंखे यांनी महाविद्यालयाला विज्ञान शाखेसाठी एकूण ५००० रुपयाची देणगी दिली व भविष्यात महाविद्यालयाला काही समस्या असतील तर मदतीचे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पाहुण्यांची ओळख विद्यार्थी प्राचार्य सलीम शेख यांनी सूत्रसंचालन अक्षय शिंदे कु.पन्हाळकर यांनी तर आभार कु.अक्षदा जाधव हिने मानले.
महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक,विद्यार्थी-विद्यार्थिनी,सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर बहुसंख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 6th Sep 2022 04:27 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 6th Sep 2022 04:27 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 6th Sep 2022 04:27 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 6th Sep 2022 04:27 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 6th Sep 2022 04:27 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 6th Sep 2022 04:27 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Tue 6th Sep 2022 04:27 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Tue 6th Sep 2022 04:27 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Tue 6th Sep 2022 04:27 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Tue 6th Sep 2022 04:27 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Tue 6th Sep 2022 04:27 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Tue 6th Sep 2022 04:27 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Tue 6th Sep 2022 04:27 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Tue 6th Sep 2022 04:27 am