आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्या मुळे मेढा नगरीच्या अत्याधुनिक स्मशानभूमीचा प्रश्न अखेर सुटला
स्मशानभूमी साठी १ एकर जागा झाली उपलब्धSatara News Team
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
- बातमी शेयर करा

जावली : जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा नगरीचा स्मशानभूमीचा प्रश्न जागेअभावी अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश मिळाले असून मेढा नगरीच्या अत्याधुनिक, सुसज्ज स्मशानभूमी उभारण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कण्हेर धरणासाठी संपादीत क्षेत्रातील १ एकर जागा मेढा नगरीच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
जावली तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीला अत्याधुनिक सोयींनीयुक्त स्मशानभूमी नसल्याने मोठी गैरसोय होत असते. मेढा नगरीसाठी अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. या स्मशानभूमीला शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार कण्हेर धरणासाठी संपादीत असलेल्या क्षेत्रातील १ एकर जागा स्मशानभूमीला मिळावी असा प्रस्ताव राज्याच्या जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेढा स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार ना. फडणवीस यांनी मेढा स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार मेढा नगरीच्या अत्याधुनिक स्मशानभूमी उभारणीसाठी कण्हेर धरणासाठी संपादीत क्षेत्रातील १ एकर जागा (जी जुन्या स्मशानभूमीलगत आहे ती) प्रचलीत रेडीरेकनर दरानुसार व एसबीआय प्राईम लँडिंग दरानुसार येणारा भाडेपट्टा प्रतिवर्षी निश्चित करून भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय नियामक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे मेढा नगरीला अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता १ एकर जागेत सुसज्ज स्मशानभूमी, लोकांसाठी बसण्याची आणि पाण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. मेढा नगरीचा स्मशानभूमीचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मेढावासियांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले आहेत.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 27th Sep 2024 01:03 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Fri 27th Sep 2024 01:03 pm