शेंद्रे येथे भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक; एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी

सातारा: पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रेजवळ भरधाव ट्रकने पाठीमागून दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये एकजण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. मृत सातारा तालुक्यातील कुसवडे येथील आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सातारा तालुक्यातील खिंडवाडीकडून शेंद्रेकडे महामार्गावरुन फरशी भरलेला ट्रक (एचआर, ७४ ए, ६००७) जात होता. भरधाव वेगात हा ट्रक होता. या ट्रकची शेंद्रे गावच्या हद्दीत दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक बसली. यामध्ये प्रदीप शंकर सराटे (वय ५०, रा. कुसवडे, ता. सातारा) हे ठार झाले. तर त्यांच्याच दुचाकीवरील अनिल बबन महाडिक (वय ५०, रा. कुसवडे) हे गंभीर जखमी झाले.

 दुसऱ्या दुचाकीवरील राजेश श्रीरंग पवार (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) हेही जखमी झाले. अपघातानंतर जखमी दोघांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर यातील मृत प्रदीप सराटे आणि अनिल महाडिक हे दोघेजण सातारा आैद्योगिक वसाहतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. काम करुन घरी जाताना हा अपघात झाला. तर या अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. तर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला