यवतेश्वर घाटात शनिवारी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. ....पोलीसाची भीती नाहीच
Satara News Team
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
- बातमी शेयर करा

सातारा : यवतेश्वर घाटात शनिवारी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. पुण्याचा युवक दारू पिऊन चारचाकी गाडी चालवत असताना गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात होऊन गाडी पलटी झाली. देव बलवत्तर म्हणून युवकाचे प्राण वाचले. सकाळी घाटात वाहनांची संख्या कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
पुण्याहून कास-यवतेश्वरला फिरण्यासाठी एक युवक आला होता. सातारच्या दिशेने जाताना त्याने दारूचे सेवन केले. यवतेश्वर घाटातील गणेशखिं डच्या परिसरात त्याचा चारचाकी गाडीवरील ताबा सुटला. आणि गाडी झाडाला जाऊन धडकली यात युवक जखमी झाला या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून गाडी (एम एच १२ टी वाय ६६७८) ताब्यात घेतली. त्याला रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
सकाळची वेळ असल्याने घाटात वाहनाची संख्या कमी होती. यामुळे मोठा अनर्थ टळला कोणतीही घटना झाली की मग तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात परंतु घटना होऊ नये यासाठी कोणतीही खबरदारी या ठिकाणी घेतली जात नाही
तालुक्यातील पोलीसाची भिती नाहीच
यवतेश्वर कास परिसरात गेल्या काही दिवसांपासून कसलाच पोलिसांचा धाक पर्यटक तसेच स्थानिक हुल्लडबाज युवकांवर राहीलेला दिसत नाही .यवतेश्वर परिसरात तर खुले आम रस्त्याच्या कडेला मध्यपान केलं जात आहे. सायंकाळचे सहा वाजले की रात्रीच्या अकरा पर्यंत या ठिकाणी आयाराम गयाराम ची मेहफिल बसलेली असते. यातच प्रेमीयुगल यांची कमी नाही. यातून एखादी घटना घडल्यावर तालुका पोलिसांना जाग येणार का असा सवाल स्थानिक करत आहे. इलेक्शन ड्युटी च्या नावाखाली ज्या ठिकाणी वर कमय होते या ठिकाणीच पोलीस दिसत असल्याचं बोललं जात आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sun 10th Nov 2024 12:04 pm
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sun 10th Nov 2024 12:04 pm