श्री क्षेत्र भरतगाववाडीच्या श्री गजानन भंडारा उत्सवास प्रारंभ

दोन वर्षांनंतर पार पडणार भव्य रथोत्सव भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण

नागठाणे;  कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जनतेला निर्बंधांमुळे उत्सव साजरे करता आले न्हवते.मात्र यावर्षी निर्बंध हटवले गेले असल्याने जनता विविध उत्सव मोठ्या जोमात साजरे करू लागले आहेत.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचे आगमनही नुकतेच जल्लोषात झाले आहे.हाच जल्लोष श्री क्षेत्र भरतगाववाडी (ता.सातारा) येथेही पहावयास मिळाला.कोरोना निर्बंध हटल्याने येथील ग्रामदैवत असलेल्या श्री गणरायाच्या उत्सवमूर्तीचे मोठ्या दिमाखात आगमन झाले असून येथील भंडारा उत्सवास प्रारंभ झाला आहे.यानिमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.
         श्री क्षेत्र भरतगाववाडीचा श्री गजानन भंडारा उत्सव सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे.अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी उत्सवमूर्ती श्री गणरायाची निघणारी भव्य रथयात्रा,त्यानिमित्ताने यात्रेत सातारा कंदी पेढ्याची होणारी मोठी विक्री आणि भाविकांना देण्यात येणारा पुरणपोळ्यांचा महाप्रसाद यामुळे हा उत्सव प्रसिद्ध आहे.या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.यावर्षी ही भव्य रथयात्रा १० सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
       या यात्रेनिमित्त ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पहाटे ४ ते ६ काकड आरती,सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, सायंकाळी ५ ते६ प्रवचन,६ ते ७ हरिपाठ व रात्री ८ ते ११कीर्तन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यावेळी प्रख्यात महिला कीर्तनकार ह.भ.प शिवलीलाताई पाटील (बार्शी),विनोदमूर्ती ह.भ.प.माऊलीमहाराज पठाडे (कर्जत),ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील(बुलढाणा) या प्रख्यात किर्तनकारांसह ह.भ.प मारुती महाराज निगडीकर,ह.भ.प संतोष महाराज ढाणे(पाडळी),ह.भ.पअनंत मिस्त्री कुसूंबीकर व ह.भ.प श्री ज्ञानेश्वर माऊली गोजेगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र भरतगाववाडीच्या ग्रामस्थांनी केले आहे.या यात्रेनिमित्त बोरगाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला