आतातरी देवा मला पावशील का! वनगळ रस्त्याच काम करशील का ? (शाळकरी मुलींची ठेकेदाराकडे विनवणी)

उप अभियंत्याच्या आदेशाला शाखा अभियंत्याकडून केराची टोपली?

शिवथर. : सातारा तालुक्यातील आरफळ-वनगळ रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीवरून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू असल्याची बातमी सातारा न्यूज ने प्रसिद्ध केली होती पंधरा दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध करून सुद्धा संबंधित शाखा अभियंता ठेकेदाराला कोणतीही सूचना देत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामसडक योजनेचे उपअभियंता यांनी या रस्त्याचे शाखा अभियंता यांना सूचना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले असल्याने याचा त्रास शाळेमध्ये येता जाता शाळकरी मुलींना होत असल्याने आता तरी मला पावशील का वनगळ रस्त्याचे काम करशील का अशी आर्त हाक शाळकरी मुलींनी संबंधित ठेकेदाराला दिली आहे त्यामुळे ग्रामस्थ व पालक वर्गातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


        आरफळ-वनगळ रस्त्याचं कोट्यावधीं रुपयाचे काम अतिशय संथ गतीने चालत असल्यामुळे वाहनचालक ग्रामस्थ तसेच शाळकरी मुलं यांना याचा त्रास होत आहे असे असताना देखील संबंधित शाखा अभियंता गांधारीची भूमिका घेत आपले खिसे गरम करून ठेकेदाराला अभय देत असल्याचं ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. झालेलं काम देखील दर्जेदार पद्धतीचे झालं नसल्याने पूर्णतः रस्ता खडीने उखरलेली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या शिफारशीवरून या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये आणलेले असून या रस्त्याचे काम दर्जेदार कॉलिटीचे व्हावे आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळावा त्यासाठी संबंधित ठेकेदाराला पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अधिकारी यांनी समज द्यावी अशीही ग्रामस्थांमधून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे


आरफळ वनगळ रस्त्याबाबत सातारा न्यूज ने पंधरा दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले तर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तसेच चांगल्या प्रतीचे ठेकेदाराकडून काम न झाल्यास त्याचे बिल अदा करू नये असेही ग्रामस्थांनी सातारा न्यूज शी बोलताना सांगितले आहे

 

-काही दिवसांमध्येच आमची शालेय परीक्षा चालू होणार असून तत्पूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण व्हावं आणि ते चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आमच्या अपेक्षा आहे
शाळकरी मुलगी-वनगळ

 

 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला