शिवसागर जलाशयात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तिन दिवसांनी सापडला
Satara News Team
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
- बातमी शेयर करा
तेटली : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात गुरुवारी वादळामुळे स्पीड बोट उलटल्याने एकजण बुडाला होता. त्याचा मृतदेह रविवारी पाण्यावय तरंगताना आढळून आला. गजेंद्र राजपुरे, असे मृताचे नाव आहे. कायदेशीर सोपस्कार पार पाडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेटली (ता.जावली) हद्दीत शिवसागर जलाशयात टी अँड टी कंपनीची स्पीड बोट वादळी वाऱ्याने पलटी होऊन यात बोटीसह एक जण बुडाला होता, तर दोघे पोहून सुखरूप बाहेर निघाले होते. दरम्यान, गेले तीन दिवस महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू होते. मात्र, मृतदेह सापडत नव्हता.
रविवारी सकाळी राजपुरे यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मेढा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश शिंदे व विजय शिंगटे अधिक तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sun 21st Apr 2024 05:28 pm
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sun 21st Apr 2024 05:28 pm













