शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
कुलदीप मोहिते
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
- बातमी शेयर करा

शिवडे फाटा (ता. कराड) – शिवडे फाट्यावर गेल्या दोन महिन्यांपासून हायवेवरील लाईट बंद असून, संपूर्ण परिसर अंधारात गेलाय. शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या वायरिंगचं काम काही दिवसांपूर्वीच 'राज इन्फ्रा कन्स्ट्रक्शन' कंपनीने पूर्ण केलं, तरीही लाईट सुरू न झाल्यामुळे लोकांमध्ये संतापाचा सूर आहे.
या अंधारामुळे अपघात, चोरी, शेतकऱ्यांचे नुकसान अशा घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच भागात मायाक्कामातेचे मंदिर असून, हजारो भाविकांची यात्रा दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी भरत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला देखील लाईट बंद असतील, तर भाविकांसाठी हे अत्यंत असुरक्षित ठरेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड उत्तर तालुकाप्रमुख श्री. संजय गुलाबराव भोसले यांनी उंब्रज वीज मंडळाला निवेदन देत ५ एप्रिलपर्यंत लाईट सुरू न झाल्यास "शिवसेना स्टाईल"ने आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा दिला आहे.
"लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाची जबाबदारी झटकून चालणार नाही. वेळेत लाईट सुरू न झाल्यास वीज विभागाला याची जबाबदारी घ्यावी लागेल," असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना संभाजी घाडगे, सागर कुलकर्णी, शंकरराव घाडगे, कोंडीबा गुजले, सोन्या जांभळे, विलास कारंडे, श्री गमाने, साहिल मुल्ला, . पालसांडे ,शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते
प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ लाईट सुरू करावेत, हीच जनतेची मागणी आहे.
लाईट बिल थकीत असल्यामुळे लाईट बंद करण्यात आली आहे एन एच आय नॅशनल हायवे यांनी ते बिल भरायचे आहे आदानी कंपनीचे सचिन देवकर ते लाईट बिल भरत असतात त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे लवकरच लाईट सुरु होईल
वैशाली जाधव वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी उंब्रज
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sat 5th Apr 2025 08:13 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sat 5th Apr 2025 08:13 pm