लाच देणे, घेणे अथवा मतदारांना धमकी याबाबतच्या तक्रारींसाठी १९५० टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा :   नागरिकांनी कोणतीही लाच स्वीकारण्यापासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.  जर कोणी लाच देत असेल अथवा लाच देण्याघेण्याबाबत कोणतीही माहिती असेल अथवा मतदारांना धमकी/धाकदपटशा करीत असेल तर   जिल्हयाच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी हा कक्ष २४ तास सर्व दिवशी चालू राहील.

भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ ख नुसार, निवडणूक प्रक्रियेच्या काळात त्याच्या मतदानाचा हक्क वापरण्याकरिता व्यक्तीला प्रलोभन दाखवण्याच्या कोणतेही परितोषिक, रोख रक्कम किंवा या प्रकारचे देणारी किंवा स्वीकारणारी कोणतीही व्यकती एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्हीस, शिक्षापात्र असेल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.   तसेच ज्याबाबी   भारतीय दंड संहितेचे उल्लंघन करतील अशांवर    एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्हीस शिक्षा पात्र असेल.  लाच घेणारा व देणारा या दोहांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी आणि मतदारांना धमकी देणा-या व धाकदपटशा करणा-या विरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशीही माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला