स्विफ्ट व ओमनीच्या धडकेत ५ जण जखमी
Satara News
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
- बातमी शेयर करा
नागठाणे : सातारा तालुक्यातील खोजेवाडी- देशमुखनगर दरम्यान अँटलांटा पेट्रोलपंपा जवळ स्वीप्ट आणि मारूती कार यांची समोरा समोर धडक होवून पाच जण जखमी झाले.रविवारी दुपारी हा अपघात झाला असून त्यातील दोघे गंभीर जखमी आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून मारुती व्हॅन मधील यशवंत दिनकर धुमाळ, सिंधू यशवंत धुमाळ, कार्तीक यशवंत धुमाळ (रा. सातारा) व स्विफ्ट कारमधील शिवनाथ साळुंखे, अमोल साळुंखे (रा. नागठाणे.ता.सातारा), प्रतीक्षा कृष्णत घाडगे (रा. फत्यापूर,ता.सातारा) अशी जखमींची नावे आहेत. मारूती ओमनी कार बोरगावहुन नांदगावकडे जात असताना देशमुखनगर मार्गे येत असलेल्या स्विप्ट कारला जोरदार धडक दिली. घटनास्थळी आण्णा मिस्त्री, शंकर जाधव, शशीकांत घोरपडे, भरत घोरपडे, डॉ. तात्या घोरपडे व ग्रामस्थांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळी बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार फिरोज शेख,हवालदार अमोल गवळी,अपघात विभागाचे विजय देसाई,प्रकाश वाघ यांनी भेट देऊन माहिती घेतली. देशमुखनगर:- अपघातात ओम्नी व्हॅनची अशी अवस्था झाली होती
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sun 21st Aug 2022 02:17 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sun 21st Aug 2022 02:17 pm













